संरक्षण मंत्रालय
मापुटो येथे झालेल्या पहिल्या प्रशिक्षण तुकडीच्या बंदर भेटीदरम्यान भारतीय आणि मोझाम्बिक नौदल यांच्यातील संबंधाना मिळाली बळकटी
Posted On:
21 SEP 2025 6:58PM by PIB Mumbai
भारतीय नौदलाच्या पहिल्या प्रशिक्षण तुकडीने,आयएनएस तीर, आयएनएस शार्दुल, आयएनएस सुजाता आणि आयसीजीएस सारथी या जहाजांच्या समावेशासह, 16 ते 19 सप्टेंबर 2025 दरम्यान मोझाम्बिकच्या मापुटो बंदराचा चार दिवसीय दौरा पूर्ण करत शाश्वत सागरी मैत्रीचे प्रदर्शन केले.
या भेटीदरम्यान, मोझाम्बिक नौदलासमवेत 1 टीएसने कार्यचालन अंतर्चलन क्षमता (ऑपरेशनल इंटरऑपरेबिलिटी) वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने संयुक्त प्रशिक्षण मालिकेत सहभाग दर्शवला. या उपक्रमांमध्ये संयु्क्त डायव्हिंग ऑपरेशन्स, अग्निशमन, व्हीबीएसएस ऑपरेशन्स आणि ( ब्रिज मशिनरी कंट्रोल इंटिग्रेशन ड्रिल्स )पूल मिशनरी नियंत्रण एकीकृत ड्रिल्स यांचा समावेश होता. भारतीय नौदलाच्या प्रशिक्षणार्थींनी, काटेम्बे येथील मरीन कमांडो स्कूल, बोएने येथील सार्जंट स्कूल आणि मनहिका येथील आर्मी प्रॅक्टिसिंग स्कूल येथे दिलेल्या परस्पर प्रशिक्षण भेटींमुळे परस्पर सामंजस्य आणि सहकार्य वृद्धिंगत झाले. मोझाम्बिक नौदलाच्या सागरी खलाशांनी संयुक्त ईईझेड देखरेखीसाठी 1 टीएस जहाजांवरून प्रवास केला.
1 टीएसचे वरिष्ठ अधिकारी कॅप्टन टिजो के. जोसेफ यांनी भेटीदाखल आलेल्या जहाजांच्या कमांडिंग अधिकाऱ्यांसह मोझाम्बिक नौदलाचे प्रमुख रिअर अॅडमिरल युजेनियो डायस दा सिल्वा मुआतुका, एफए़डीएम (FADM) चे निरीक्षक मेजर जनरल एझक्लिएल मुयांगा आणि मापुटो हवाई दल तळाचे कमांडंट कर्नल कॅन्डिडो जोस टिरानो यांची शिष्टाचार संमत भेट घेतली. या उच्चस्तरीय बैठकींमध्ये उभय देशांमधील वाढत्या संरक्षण सहकार्यावर भर देण्यात आला.
या तैनातीचा महत्त्वाचा घटक सामुदायिक संपर्क हा होता. 1000 हून अधिक शालेय विद्यार्थ्यांनी जहाजाला भेट दिली आणि भारतीय नौदलाच्या कार्यक्षमतेची माहिती घेतली. मोझाम्बिक नौदल मुख्यालय आणि मापुटो मधील स्थानिक रुग्णालयात एका वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 100 हून अधिक रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्यात आली आणि गंभीर आजारांना प्रतिबंध, आपत्कालीन प्रतिसाद आणि प्रथमोपचार यांविषयी जागरूकता मोहिम राबवण्यात आली. संयुक्त योग सत्रे आणि मैत्रीपूर्ण फुटसल सामना खेळवण्यात आला, त्यामुळे दोन्ही नौदलांमधील सौहार्दाला बळकटी मिळाली.
1 टीएस मोंबासाला रवाना होताना, ही भेट द्विपक्षीय संबंधांना अधिक बळकटी देते आणि हिंदी महासागर प्रदेशात शांतता, स्थिरता आणि सामायिक समृद्धी यांच्यासाठी नवी कटिबद्धता प्रदान करते. व्यापक महासागरी दृष्टीकोनावर आधारित आफ्रिकेतील देशांसमवेत भारताच्या सागरी भागीदारी बंदराला दिलेल्या या भेटीमुळे अधिक बळकट होत आहे.
GQ6Z.jpg)
FLKJ.jpg)
CXD2.jpg)
***
शैलेश पाटील / विजयालक्ष्मी साळवी साने / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2169331)