वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांनी भारताच्या डिजिटल व्यापार आणि निर्यात स्पर्धात्मकतेला चालना देण्यासाठी लॉजिस्टिक्स डेटा बँक 2.0 केली लाँच
लॉजिस्टिक्स कार्यक्षमता वाढविण्यासाठी, एमएसएमई क्षेत्राला पाठबळ देण्यासाठी आणि भारताच्या जागतिक पुरवठा साखळ्या अधिक बळकट करण्यासाठी लॉजिस्टिक्स डेटा बँक 2.0 केली लाँच
Posted On:
20 SEP 2025 6:57PM by PIB Mumbai
मेक इन इंडियाच्या दशकपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज नवी दिल्ली येथे लॉजिस्टिक्स डेटा बँक (LDB) 2.0 लाँच केली. भारताला डिजिटलदृष्ट्या सक्षम, गुंतवणूकीसाठी अनुकूल आणि निर्यात-स्पर्धात्मक अर्थव्यवस्था बनवण्याच्या प्रवासातील हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे गोयल यांनी सांगितले. लॉजिस्टिक्स डेटा बँक 2.0 लॉजिस्टिक्स परिसंस्थेतील सुविधा आणि पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेबद्दल महत्त्वपूर्ण माहिती प्रदान करेल, अशी माहिती गोयल यांनी दिली. या प्रणालीमुळे लॉजिस्टिक्स कामगिरीचे रिअल-टाइम ट्रॅकिंग आणि मूल्यांकन करणे शक्य होईल. परिणामी नियोजन अधिक चांगले होईल, कार्यक्षमता वाढेल आणि खर्च कमी होईल, असे ते म्हणाले. हा उपक्रम उद्योग आणि सरकार दोघांसाठी स्पर्धात्मकता मजबूत करण्यात, पुरवठा साखळी व्यवस्थापन सुधारण्यात तसेच भारतातील लॉजिस्टिक्स अधिक कार्यक्षम आणि व्यवसाय-अनुकूल बनविण्यात एक महत्त्वाचे साधन म्हणून काम करेल, ते त्यांनी नमूद केले.
एनआयसीडीसी लॉजिस्टिक्स डेटा सर्व्हिसेस (एनएलडीएसएल) द्वारे विकसित लॉजिस्टिक्स डेटा बँक 2.0 हे एक लक्षणीयरीत्या प्रगत लॉजिस्टिक्स ट्रॅकिंग व्यासपीठ आहे जे खोल समुद्रात निर्यात कंटेनर ट्रॅकिंग आणि मल्टी-मॉडल शिपमेंट दृश्यमानता सक्षम करते. हे व्यासपीठ भारताच्या डिजिटल व्यापार पायाभूत सुविधांना अधिक बळकटी देते, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसेच आणि निर्यातदारांना मदत करते. यासोबतच विकसित भारत @2047 च्या दृष्टिकोनाशी सुसंगत पारदर्शक, डेटा-आधारित आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक लॉजिस्टिक्स परिसंस्था तयार करण्याची सरकारची वचनबद्धता प्रतिबिंबित करते.
लॉजिस्टिक्स डेटा बँक 2.0 मध्ये खोल समुद्रातील कंटेनर ट्रॅकिंगची सुविधा आहे, ज्यामुळे निर्यातदारांना भारतीय बंदरांमधून निघालेले कंटेनर आंतरराष्ट्रीय समुद्री सीमेतही ट्रॅक करण्याची सुविधा मिळते. यामुळे समन्वय सुधारेल आणि जागतिक बाजारपेठेत विश्वासार्हता वाढेल. तसेच हे व्यासपीठ रस्ता रेल्वे आणि समुद्र या सर्व वाहतूक मार्गांवर मल्टी मॉडेल दुष्पता उपलब्ध करून देईल. यात कंटेनर, ट्रक ट्रेलर क्रमांक तसेच रेल्वे एफएनआर चा उपयोग करून युनिफाइड लॉजिस्टिक्स इंटरफेस प्लॅटफॉर्म (यूएलआयपी) एपीआयसह एकत्रीकरण करण्यात आले आहे. लाइव्ह कंटेनर हीटमॅप सुविधेमुळे देशभरातील कंटेनर वितरणाची स्थान-आधारित दृश्ये मिळतील, त्यामुळे संबंधितांना आणि धोरणकर्त्यांना असमतोल ओळखण्यास आणि संभाव्य अडथळ्यांना वेळेवर प्रतिसाद देणे शक्य होईल.
"लॉजिस्टिक्स डेटा बँक 2.0 हे भारताला निर्यात क्षेत्रात महासत्ता बनवण्याची आमची वचनबद्धता प्रतिबिंबित करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, आम्ही आधुनिक लॉजिस्टिक्स आणि औद्योगिक विकासाचा डिजिटल कणा बांधत आहोत, असे त्यांनी सांगितले. हा उपक्रम निर्यातदार आणि उत्पादकांना रिअल-टाइम माहिती आणि स्मार्ट पायाभूत सुविधा उपलब्ध करून आत्मनिर्भर भारताच्या दिशेने भारताच्या प्रवासाला गती देईल." असे या प्रसंगी बोलताना गोयल म्हणाले.
लॉजिस्टिक्स डेटा बँक 2.0 पोर्टल लाँच पाहण्यासाठी येथे क्लिक करा:
: https://drive.google.com/file/d/1muzHd_wpOodgX24x6Z_T7VD9E3-fWSDV/view?usp=drive_link
***
शैलेश पाटील / श्रद्धा मुखेडकर / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2169092)