ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हापसा शाळेला एमपीएलएडी निधीतून खरेदी केलेल्या माहिती तंत्रज्ञान उपकरणांचे केले वाटप

Posted On: 18 SEP 2025 6:29PM by PIB Mumbai

पणजी, 18 सप्टेंबर 2025


डिजिटल शिक्षण पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी तसेच विद्यार्थी व शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाने सक्षम करण्याच्या दृष्टीने ऊर्जा आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज म्हापसा येथील जी.एस. आमोणकर विद्या मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजनेअंतर्गत (एमपीएलएडीएस) खरेदी केलेल्या प्रिंटर, प्रोजेक्टर आणि संगणकांसारख्या माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान (आयसीटी) साधनांचे वितरण केले. 

कार्यक्रमात बोलताना श्रीपाद नाईक यांनी समग्र राष्ट्र उभारणीच्या दृष्टीने शिक्षणातील गुंतवणुकीचे महत्त्व अधोरेखित केले. तरुणांच्या मनात संस्कार (मूल्ये) आणि संस्कृती रुजवून समाज घडवण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते, यावर त्यांनी भर दिला. "चांगले विचार आणि मूल्यांच्या बळावर  विद्यार्थी केवळ त्यांच्या संस्था आणि समुदायांनाच उन्नत करत नाहीत तर राष्ट्र आणि जगाच्या प्रगतीतही योगदान देतात. खरा विकास तेव्हाच होतो जेव्हा आपण स्वतःपलीकडे विचार करतो आणि इतरांच्या भल्यासाठी काम करतो," असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचा समारोप करताना शाळेच्या अधिकाऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली, गोव्याच्या शैक्षणिक पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी मंत्र्यांच्या सततच्या पाठिंब्याबद्दल समाधान व्यक्त केले.

जी.एस. आमोणकर विद्या मंदिरचे अध्यक्ष अ‍ॅड. संजय उसगावकर, विश्वस्त सुहर्ष उसगावकर आणि डॉ. गुरुदास नाटेकर, मुख्याध्यापिका पूजा दळवी या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.


निलीमा ‍चितळे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2168226)
Read this release in: English