शिक्षण मंत्रालय
राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ आणि गोवा पोलीस यांच्यात पर्यटन पोलिसांचे विशेष केडर स्थापन करण्यासाठी करार
प्रविष्टि तिथि:
16 SEP 2025 7:00PM by PIB Mumbai
अहमदाबाद, 16 सप्टेंबर 2025
राष्ट्रीय रक्षा विद्यापीठाच्या अंतर्गत सुरक्षा आणि स्मार्ट पोलिसिंग स्कूलने गोवा पोलिसांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या पर्यटन पोलिसिंगवरील पाच दिवसांच्या निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यामध्ये जम्मू आणि काश्मीर, दमण आणि दीव आणि दादरा आणि नगर हवेली, अंदमान आणि निकोबार, लक्षद्वीप आणि गोवा येथील पोलिस अधिकाऱ्यांचा सहभाग आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तयार करण्यात येणाऱ्या पर्यटन पोलीस यंत्रणा पुढाकाराअंतर्गत आयोजित केलेला हा कार्यक्रम म्हणजे पोलिस अधिकाऱ्यांचे कौशल्य वाढवणे आणि कौशल्याला पुन्हा उजाळा देण्यासाठी पर्यटनाच्या क्षेत्रात क्षमता निर्माण करण्याच्या दिशेने उचलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रमुख पाहुणे म्हणून गोव्याचे पोलीस महासंचालक आलोक कुमार होते; तर गोव्याचे पोलिस महानिरीक्षक के.आर. चौरसिया, राष्ट्रीय रक्षा विद्यापीठाच्या अंतर्गत सुरक्षा आणि स्मार्ट पोलिसिंग स्कूलचे संचालक भवानीसिंह राठौर, गोव्याचे पोलीस अधीक्षक विश्राम बोरकर (प्रशिक्षण) राष्ट्रीय रक्षा विद्यापीठाचे विशाल कटारिया आदित्य भूषण हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन कनिष्ठ संशोधन अधिकारी विशाल कटारिया, यांच्या स्वागतपर भाषणाने झाले . हा पर्यटन पोलिसिंगवरील पाच दिवसांचा अग्रगण्य निवासी प्रशिक्षण कार्यक्रम आहे, जो देशातील अशा प्रकारचा पहिला कार्यक्रम आहे. एका विशेष केडरच्या निर्मितीचे चिन्हांकन करताना, या भाषणात पर्यटन क्षेत्रासाठी सुरक्षित, संवेदनक्षम आणि व्यावसायिक धोरणाच्या निर्मितीवर भर देण्यात आला तसेच पर्यटकांची सुरक्षा, प्रादेशिक पातळीवरील आव्हानांना सामोरे जाणे आणि सांस्कृतिक दृष्ट्या जाणीव जागृत ठेवून आणि प्रभावी पर्यटन पोलिसिंगच्या माध्यमातून 2047 पर्यंत भारताच्या विकसित भारताच्या ध्येयदृष्टीला पाठिंबा देण्यावर भर देण्यात आला.

राष्ट्रीय रक्षा विद्यापीठाच्या अंतर्गत सुरक्षा आणि स्मार्ट पोलिसिंग स्कूलचे संचालक भवानीसिंह राठौर यांनी आपल्या भाषणात अतिथी देवो भव या संकल्पनेचे महत्त्व सांगितले तसेच देशाची पर्यटन क्रमवारी सुधारण्यासाठी सामूहिक प्रयत्नांवर भर दिला. या विचारप्रवर्तक सत्रांमध्ये झालेल्या चर्चेच्या आणि मांडण्यात आलेल्या प्रश्नांच्या आधारे पर्यटन पोलिसिंगच्या दृष्टीने राष्ट्रीय रक्षा विद्यापीठाच्या कृतीयोजनेविषयी त्यांनी माहिती दिली.
यावेळी गोवा पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी पायाभूत सुविधांच्या विकासाचे आणि सांस्कृतिक विविधता आणि परंपरेबद्दल जनजागृती करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.त्यांनी गोव्यातील पर्यटन परिसंस्था आणि पर्यटनाच्या समस्येवर आणि आव्हानांवर गोवा पोलिसांच्या प्रतिसाद यंत्रणेचे महत्त्व विशद करून सांगितले. पोलिसांनी पर्यटकांनी केलेल्या गुन्ह्यांवर देखील लक्ष केंद्रित केले पाहिजे,असे ते पुढे म्हणाले.
15 ते 19 सप्टेंबर 2025 या कालावधीत होणाऱ्या पर्यटन पोलिसिंगवरील या पाच दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात पर्यटन पोलिसिंग, पर्यटकांचे हक्क, आपत्कालीन प्रतिसाद, संकटकालीन व्यवस्थापन, सॉफ्ट स्किल्स, संवाद कौशल्ये, सांस्कृतिक संवेदनशीलता आणि भिन्नता याविषयी जनजागृती मोहिमा,प्रकृतीस्वास्थ्य, प्रदूषण नियंत्रण, संघर्ष निराकरण, आचारसंहिता, समकालीन आव्हाने आणि पाळत ठेवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाचा वापर या विषयांचा समावेश असेल, ज्यामध्ये प्रत्यक्ष कौशल्य आणि सिध्दांत सत्रांचा समावेश असेल.
प्रशिक्षण कार्यक्रम जसजसा पुढे जाईल तसतसे ज्ञान आणि कौशल्याच्या देवाणघेवाणीमुळे जम्मू आणि काश्मीर, दमण आणि दीव आणि दादरा आणि नगर हवेली, अंदमान आणि निकोबार, लक्षद्वीप आणि गोवा यासह 5 वेगवेगळ्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतून सहभागी झालेल्या एकूण 78 जणांच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होईल अशी अपेक्षा आहे. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट केवळ प्रगत कौशल्ये प्रदान करणे नाही तर कायदा आणि सुव्यवस्था यांची अंमलबजावणी करणाऱ्या आस्थापना आणि संबंधित भागधारकांमध्ये सहकार्य आणि परस्पर समजूतदारपणाची भावना निर्माण करणे हा देखील आहे.
राष्ट्रीय रक्षा (सुरक्षा)विद्यापीठाबद्दल:
राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ (RRU) ही 2020 मध्ये गृह मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापन झालेली महत्त्वाची राष्ट्रीय संस्था आहे.ही संस्था पाळत ठेवणे आणि अंतर्गत सुरक्षा क्षेत्रातील शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधनावर लक्ष केंद्रित करते. गुजरातमधील गांधीनगर येथे असलेल्या,या विद्यापीठाचे मातृभूमी सुरक्षा अभ्यास आणि संशोधनात जागतिक आघाडीवर नेतृत्व करण्याचे उद्दिष्ट आहे.
शैलेश पाटील/भक्ती सोनटक्के/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2167310)
आगंतुक पटल : 14