आयुष मंत्रालय
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी माउंट अबू येथील ब्रह्मकुमारी मुख्यालयाला दिली भेट
मंत्री जाधव यांनी माउंट अबू येथे मन-शरीर चिकित्सा या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे केले उद्घाटन
Posted On:
12 SEP 2025 5:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 सप्टेंबर 2025
केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी माउंट अबूच्या एक दिवसाच्या दौऱ्यात समग्र निरामयता आणि आध्यात्मिक आरोग्याला प्रोत्साहन देणाऱ्या विविध महत्त्वपूर्ण उपक्रमांमध्ये सहभाग घेतला.
या भेटीदरम्यान, मंत्र्यांनी ब्रह्मकुमारींनी ज्ञान सरोवर येथे आयोजित केलेल्या 51 व्या राष्ट्रीय ‘मन-शरीर चिकित्सा : स्वयं -काळजीद्वारे आरोग्यसेवा’ या परिषदेचे उद्घाटन केले. प्रतापराव जाधव यांनी आपल्या भाषणात ध्यानधारणा, आंतरिक शक्ती आणि समग्र जीवनाचा संदेश पसरवण्यासाठी ब्रह्मकुमारींनी दशकानूदशके दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. स्वयं -काळजीवर ब्रह्मकुमारी देत असलेला भर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारताच्या आध्यात्मिक वारशाशी आधुनिक आरोग्यसेवेचे एकत्रीकरण करण्याचे समर्थन करणाऱ्या दृष्टिकोनाशी सुसंगत असल्याचे जाधव यांनी सांगितले. आरोग्यसेवा क्षेत्रात भारत वेगाने प्रगती करत असत आहे, असे सांगत अशा उपक्रमांमध्ये मन, शरीर आणि आत्मा यांच्यातील सुसंवाद जोपासणे यातून खरे आरोग्य अधोरेखित होते, असे मत मंत्र्यांनी व्यक्त केले.
जाधव यांनी ज्ञान सरोवर येथे ब्रह्मकुमारी शिवानी दीदी यांच्याशी अर्थपूर्ण संवाद साधला. जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय योग दिनाप्रमाणेच समर्पित "ध्यान दिन" साजरा करण्याच्या शिवानी दीदींच्या प्रस्तावाचे मंत्री जाधव यांनी कौतुक केले आणि त्याला पाठिंबा दिला.
एका महत्त्वपूर्ण घोषणेद्वारे मंत्र्यांनी जाहीर केले की राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ (एनएमपीबी) ब्रह्माकुमारींच्या कृषी शाखेच्या नेतृत्वाखालील वृक्षारोपण उपक्रमांना पाठिंबा देईल, ज्यामुळे समग्र आरोग्य पद्धतींमध्ये औषधी आणि आध्यात्मिक वनस्पतींचा वापर आणखी वाढेल.
मंत्र्यांनी एका ध्यान सत्रातही भाग घेतला. हे सत्र आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध करणारे असल्याचे जाधव यांनी सांगितले. असे अनुभव आंतरिक शक्ती वाढवतात, मानसिक एकाग्रता वाढवतात तसेच अधिक संतुलित आणि सकारात्मक जीवनशैलीसाठी पथदर्शक म्हणून काम करतात, असे ते म्हणाले.





सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2166063)
Visitor Counter : 2