सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय औद्योगिक वर्गीकरण (एनआयसी)- 2025 च्या मसुद्यावर एमओएसपीआयने मागवले अभिप्राय

Posted On: 10 SEP 2025 6:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 सप्टेंबर 2025 

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय (एमओएसपीआय) हे डेटा संचयन, संकलन आणि प्रसारासाठी मानके निश्चित करण्यासाठी नोडल मंत्रालय आहे. डेटाचे यथाकालत्व, गुणवत्ता आणि सूक्ष्मता सुधारण्यासाठी प्रमुख निर्देशकांचे आधार वर्ष अद्यतनित करणे, स्थानिक स्तरावर डेटा संकलन सक्षम करण्यासाठी विविध सर्वेक्षणांच्या पद्धतींमध्ये सुधारणा करणे आणि विविध सांख्यिकीय वर्गीकरण अद्यतनित करणे यासारख्या अनेक संरचनात्मक सुधारणा मंत्रालय करत आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, मंत्रालयाने आता त्यांचे राष्ट्रीय औद्योगिक वर्गीकरण (एनआयसी)-2008 मध्ये सुधारणा करून एनआयसी -2025 चा मसुदा तयार केला आहे.

एनआयसी-2025 चा मसुदा प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, उद्योग संघटना आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असलेल्या तज्ज्ञ समितीच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रालये/विभाग, उद्योग तज्ज्ञ आणि अन्य संबंधित संस्थांसह हितधारकांशी व्यापक सल्लामसलत देखील करण्यात आली.

राष्ट्रीय औद्योगिक वर्गीकरणाचे महत्त्व आणि विविध हितधारकांकडून त्याचा वापर लक्षात घेता, सुधारित एआयसी -2025 सुसंबद्ध, असंदिग्ध आणि वापरकर्ता-अनुकूल राहावे यासाठी सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय सर्व हितधारक, सरकारी संस्था, उद्योग प्रतिनिधी, शैक्षणिक संस्था आणि सामान्य जनतेकडून अभिप्राय आणि सूचना मागवत आहे. कृपया 20 सप्टेंबर, 2025 पर्यंत ईमेलद्वारे (classification-esd@mospi.nic.in) अभिप्राय सादर करावे. ईमेलचा विषय कृपया "मसुदा एनआयसी 2025 वरील अभिप्राय" असा असावा. https://forms.gle/dZeAbDonxYWVE6nQ6 या लिंकद्वारे देखील अभिप्राय नोंदवता येतील.

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या संकेतस्थळावरील खालील लिंकवर एनआयसी-2025 चा मसुदा पाहता येईल:

https://www.mospi.gov.in/sites/default/files/main_menu/national_industrial_classification/Draft_Structure_NIC-2025.xlsx

सुवर्णा बेडेकर/वासंती जोशी/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2165394) Visitor Counter : 2
Read this release in: English , Urdu , Hindi