वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली निर्यातदारांसोबत जागतिक व्यापार गतिशीलतेबाबत बैठक
Posted On:
03 SEP 2025 7:50PM by PIB Mumbai
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज निर्यात प्रोत्साहन परिषद (ईपीसी) आणि उद्योग संघटनांसोबत वाढत्या जागतिक शुल्कांना तोंड देण्यासाठी, उपाय शोधण्यासाठी आणि बदलत्या व्यापार गतिशीलतेच्या पार्श्वभूमीवर पुढे जाण्याचा मार्ग आखण्यासाठी आयोजित बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. या बैठकीत ईपीसी आणि उद्योग संघटनांचे प्रतिनिधी, वाणिज्य विभाग आणि परराष्ट्र व्यापार महासंचालनालय (डीजीएफटी) चे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.
चर्चा प्रामुख्याने काही विशिष्ट भारतीय उत्पादनांवरील शुल्क वाढीसंदर्भातील अलीकडील घडामोडींवर केंद्रित होती. निर्यातदार आणि उद्योग प्रतिनिधींनी या शुल्क अडथळ्यांमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवर, प्रमुख आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये भारतीय मालाच्या स्पर्धात्मकतेवर त्यांचा प्रभाव अधोरेखित केला आणि लक्ष्यित, क्षेत्र-निहाय हस्तक्षेपांच्या गरजेवर भर दिला.
जागतिक व्यापाराच्या बदलत्या परिस्थितीत भारतीय निर्यातदारांच्या हिताचे रक्षण करण्याप्रति सरकारच्या अतूट वचनबद्धतेचा गोयल यांनी पुनरुच्चार केला. सरकार अलिकडच्या काळातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी निर्यातदारांना मदत करण्यासाठी सक्षम वातावरण निर्माण करण्यात सरकार सक्रीयपणे प्रयत्नशील आहे असे आश्वासन त्यांनी उद्योग प्रतिनिधींना दिले.
वस्त्रोद्योग, तयार कपडे , अभियांत्रिकी, रत्ने आणि दागिने, चामडे, वैद्यकीय उपकरणे, औषधनिर्माण, कृषी आणि सेवा यासारख्या क्षेत्रातील ईपीसी आणि उद्योग संघटनांनी क्षेत्र- निहाय समस्या मांडल्या. त्यांनी सरकारच्या सक्रीय सहभागाचे कौतुक केले आणि भारताची व्यापार लवचिकता वाढविण्यासाठी पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले.
सक्रीय दृष्टिकोनावर भर देत, गोयल यांनी राष्ट्रीय हितासाठी दीर्घकालीन उपाय शोधण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न अधोरेखित केले. त्यांनी निर्यातदारांना उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्याचे, जागतिक मानकांना अनुरूप करण्याचे, पुरवठा साखळींमध्ये विविधता आणण्याचे आणि पर्यायी बाजारपेठांचा शोध घेण्याचे आवाहन केले. सरकार क्षेत्रीय समस्या दूर करण्यासाठी आणि शाश्वत निर्यात वाढीसाठी वचनबद्ध असून पर्यायी यंत्रणेच्या गरजेवर व्यापक एकमत झाले, .
भारताचे दीर्घकालीन ध्येय देशांतर्गत उत्पादन मजबूत करणे, निर्यातीला चालना देणे हे आहे यावर त्यांनी भर दिला . त्यांनी ईपीसी आणि उद्योग प्रतिनिधींना आश्वासन दिले की सरकार वाढत्या शुल्क उपायांचा परिणाम कमी करण्यासाठी व्यवसाय सुलभीकरण उपक्रम, लक्ष्यित व्यापार समर्थन तसेच वेळेवर धोरणात्मक हस्तक्षेपाद्वारे एक सहाय्यक परिसंस्था प्रदान करण्यास वचनबद्ध आहे.
***
शैलेश पाटील / सुषमा काणे / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2163534)
Visitor Counter : 2