संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदलाची युद्धनौका पापुआ न्यू गिनीच्या 50 व्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात सहभागी होण्यासाठी पोर्ट मोरेस्बी येथे दाखल
प्रविष्टि तिथि:
30 AUG 2025 5:40PM by PIB Mumbai
भारतीय नौदलाची स्वदेशी पाणबुडी विरोधी युद्धनौका आयएनएस कदमत्त आज पापुआ न्यू गिनीच्या पोर्ट मोरेस्बी बंदरात दाखल झाली असून ती पापुआ न्यू गिनीच्या 50 व्या स्वातंत्र्यदिन समारंभात सहभागी होणार आहे. युद्धनौकेचा हा सदिच्छा दौरा भारत आणि पापुआ न्यू गिनी यांच्यातील वाढत्या मैत्रीपूर्ण संबंधांचे आणि सागरी भागीदारीचे प्रतिक आहे. ही सदिच्छा भेट ‘अॅक्ट ईस्ट’ धोरणाअंतर्गत पॅसिफिक बेटांशी भारताच्या संबंधांना बळकटी देण्याच्या वचनबद्धतेचे तसेच हिंद प्रशांत प्रदेशात शांतता, स्थैर्य आणि सर्वसमावेशक विकासाला मिळणाऱ्या प्रोत्साहनाचे द्योतक आहे.
या भेटीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे आयएनएस कदमत्त पापुआ न्यू गिनीच्या स्वातंत्र्यदिनाच्या अधिकृत संचलनात आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणार असून यामुळे दोन्ही राष्ट्रांच्या सामायिक लोकशाही मूल्यांचा आणि वारशाचा गौरव होईल. या युद्धनौकेवरील नौदलाचे अधिकारी पापुआ न्यू गिनी डिफेन्स फोर्स सोबत सागरी सुरक्षेतील सहकार्य, मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण कार्य या क्षेत्रात सहकार्यांच्या संधीचा शोध घेतील. या युद्धनौकेवर पापुआ न्यू गिनीच्या संरक्षण दल प्रमुखांचे स्वागत केले जाईल ज्यातून भारतीय नौदलाच्या आत्मनिर्भरतेच्या प्रवासाची झलक सादर केली जाईल.
ही भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2023 मधील पापुआ न्यू गिनीच्या ऐतिहासिक भेटीमुळे निर्माण झालेल्या दृढ संबंधांना अनुसरून आहे. पंतप्रधानांच्या त्या भेटीत दोन्ही देशांनी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी, विकास भागीदारी विस्तारण्यासाठी आणि संरक्षण सहकार्य वाढविण्याप्रति वचनबद्धता दर्शविली होती. भारतीय नौदल आपली 'मैत्रीचे पूल' बांधण्याची राजनैतिक भूमिका पार पाडत आहे, जी बंदरांना भेटी , क्षमता विकास उपक्रम आणि सहकार्यपूर्ण सागरी प्रयत्नांच्या माध्यमातून राष्ट्रांना एकमेकांशी जोडते.
QNOQ.jpg)
0D81.jpg)
***
सुषमा काणे / श्रद्धा मुखेडकर / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2162326)
आगंतुक पटल : 29