श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ईएसआयसीमधील सहाय्यक संचालक भाविना पटेल यांनी अमेरिकेतील स्पोकेन येथे झालेल्या आयटीटीएफ वर्ल्ड पॅरा स्पर्धांमध्ये घडविला इतिहास


आयटीटीएफ वर्ल्ड पॅरा एलिट स्पर्धेच्या महिला एकेरी वर्ग 4-5 प्रकारात सुवर्ण आणि आयटीटीएफ वर्ल्ड पॅरा फ्युचर स्पर्धेच्या त्याच श्रेणीत जिंकले रौप्य पदक

Posted On: 18 AUG 2025 10:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 ऑगस्ट 2025

अहमदाबाद येथील कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएस आयसी) प्रादेशिक कार्यालयातील सहाय्यक संचालक भाविना पटेल यांनी अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील स्पोकेनमध्ये झालेल्या दोन प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पॅरा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धांमध्ये सर्वोच्च सन्मान पटकावून भारताला अभिमानास्पद कामगिरी केली आहे.

9 ते 13 ऑगस्ट 2025 दरम्यान आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशन (आयटीटीएफ) च्या जागतिक पॅरा एलिट स्पर्धेत भाविना यांनी उत्कृष्ट कामगिरी करत महिला एकेरी वर्ग 4-5 प्रकारात सुवर्णपदक जिंकले. हा विजय म्हणजे त्यांचे  अपवादात्मक कौशल्य, दृढनिश्चय आणि जगातील काही सर्वोत्तम पॅरा टेबल टेनिस खेळाडूंविरुद्धच्या धोरणात्मक खेळाचा परिणाम आहे.

जागतिक स्तरावरील स्वतःचे सातत्य आणि स्पर्धात्मक क्षमता  सिद्ध करत काही दिवसांपूर्वीच 6 ते 8 ऑगस्ट 2025 दरम्यान स्पोकेन येथे झालेल्या आयटीटीएफ वर्ल्ड पॅरा फ्युचर स्पर्धेत भाविनाने त्याच श्रेणीत रौप्य पदक जिंकले होते.

या सलग दोन पोडियम कामगिरींच्या आधारे भाविना पटेल आता पॅरा टेबल टेनिसमधील महिला एकेरीच्या वर्ग 1 ते 5 श्रेणींमधील जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचल्या आहेत - भारतीय खेळांसाठी हा एक महत्त्वाचा क्षण आहे आणि उत्कृष्टता साध्य करण्याच्या त्यांच्या अथक प्रयत्नांचा पुरावा आहे.

त्यांचे  यश वैयक्तिक विजयाच्या पलीकडे जाऊन देशभरातील खेळाडूंसाठी, विशेषतः पॅरा-स्पोर्ट्स क्षेत्रातील खेळाडूंसाठी प्रेरणास्थान म्हणून काम करते, समर्पण आणि लवचिकता कोणत्याही आव्हानावर मात करू शकते या विश्वासाला बळकटी देते.

ईएस आयसी ने नेहमीच आपल्या संघटनात्मक संस्कृतीचा भाग म्हणून कर्मचाऱ्यांना क्रीडा आणि शारीरिक तंदुरुस्ती उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहन आणि पाठिंबा दिला आहे. ईएस आयसीला विश्वास वाटतो की कर्मचाऱ्यांमध्ये क्रीडा भावना निर्माण केल्याने केवळ त्यांच्या वैयक्तिक आरोग्य आणि कल्याणालाच चालना मिळत नाही तर शिस्त, संघभावना आणि चिकाटी यासारख्या मूल्यांची जोपासना होऊन कामाच्या ठिकाणी अधिक चांगली कामगिरी करता येते. गेल्या काही वर्षांत ईएस आयसी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध क्रीडा विषयांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे, संस्थेने संसाधने, रजा आणि क्रीडा कामगिरीसाठी मान्यता या बाबतीत आवश्यक ते सहाय्य उपलब्ध करून दिले आहे.

भाविना पटेल यांचे ऐतिहासिक यश म्हणजे ईएसआयसीचा क्रीडा क्षेत्रातील पाठिंबा कर्मचाऱ्यांना आपल्या व्यावसायिक जबाबदाऱ्या आणि आवड याचे संतुलन साधून जागतिक स्तरावर चमकदार कामगिरी करण्यास सहाय्यकारी ठरत असल्याचे अभिमानास्पद उदाहरण आहे. 


निलीमा चितळे/नंदिनी मथुरे /प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2157750)
Read this release in: English , Gujarati , Urdu , Hindi