युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

फिट इंडिया साठी योगदान देण्याचे, फिट इंडिया मोबाईल ॲप डाउनलोड करण्याचे डॉ. मनसुख मांडविया यांचे नागरिकांना आवाहन

Posted On: 17 AUG 2025 6:09PM by PIB Mumbai

 

युवा व्यवहार व क्रीडा तसेच कामगार व रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी सर्व नागरिकांना सायकलवर फिट इंडिया रविवार या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले. हा संदेश त्यांनी गुजरातमधील पालीताना तालुक्यातील आपल्या मूळगावी हनोल येथे दिला.

डिसेंबर 2024 मध्ये मंत्री महोदयांनी सुरू केलेला हा सायकल उपक्रम आजवर 46,000 पेक्षा अधिक ठिकाणी राबवला गेला असून 8 लाखांहून अधिक नागरिकांनी यात सहभाग नोंदवला आहे. प्रदूषणमुक्त व निरोगी भारत घडविण्याच्या उद्दिष्टाने युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाने आज राष्ट्रीय छात्र सेनेच्या  (एनसीसी)  सहकार्याने 5,000 ठिकाणी विशेष आवृत्ती आयोजित केली होती. या कार्यक्रमात 3,000 हून अधिक नमो फिट इंडिया क्लब सुद्धा सहभागी झाले होते.

A group of people on bicycles with signsDescription automatically generated

A group of people in uniformDescription automatically generated

डॉ. मांडविया यांनी नागरिकांना फिट इंडिया मोबाईल ॲप डाउनलोड करण्याचे आणि त्यातील कार्बन क्रेडिट या सोयीचा वापर करण्याचे आवाहन केले.

त्यांनी सांगितले: प्रत्येकाने फिट इंडिया मोबाईल ॲप डाउनलोड करावे आणि सायकल चालवून आपण किती कार्बन वाचवत आहोत, हे तपासावे. हे ॲप अंतर, वेळ, हृदयाची गती व आरोग्यास उपयुक्त इतर माहिती देते. सायकलिंग हा लठ्ठपणाविरोधी प्रभावी उपाय असून प्रदूषणावर मात करण्याचे साधन आहे. प्रत्येकाने  'फिट इंडिया रविवार सायकलवर' या चळवळीचा भाग व्हावे.”

A group of people riding bicyclesDescription automatically generated

A group of people riding bicyclesDescription automatically generated

दिल्लीमध्ये 1200 हून अधिक सायकलस्वारांनी जवाहरलाल नेहरू स्टेडियम परिसरात सायकल रॅलीत भाग घेतला. यावेळी झुंबा, ध्यान, योगा आणि दोरी उड्या या आरोग्यवर्धक उपक्रमांचे आयोजन डॉ. शिखा गुप्ता यांनी केले होते.

A group of people on bicyclesDescription automatically generated

तलवारबाज नाझिया शेख आणि बेनी क्वेभा यांनी या चळवळीला पाठिंबा देत लठ्ठपणा व वायूप्रदूषणाच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी या उपक्रमाचे महत्व अधोरेखित केले.

***

शैलेश पाटील/गजेंद्र देवडा/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2157331)