सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
केव्हीआयसीच्या मुंबईतील केंद्रीय मुख्यालयात 79 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
प्रविष्टि तिथि:
15 AUG 2025 9:20PM by PIB Mumbai
मुंबई, 15 ऑगस्ट 2025
भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या (एमएसएमई) अंतर्गत येणाऱ्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी) मुंबईतील विलेपार्ले येथील आपल्या केंद्रीय कार्यालयात देशभक्तीपूर्ण वातावरणात 79 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूप राशी यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजारोहण समारंभ झाला. ध्वजारोहण कार्यक्रमात केंद्रीय कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थितीत होते.

ध्वजारोहणानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. समारंभात केलेल्या भाषणात खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी खादीचे महत्त्व अधोरेखित केले. “खादी हे केवळ एक कापड नाही; तर ते भारताच्या आत्म्याचे वस्त्र आहे. पंतप्रधानांच्या ‘नव्या भारताची नवी खादी’ आणि ‘व्होकल फॉर लोकल’ या संकल्पनांनी खादीला जनआंदोलनचे रुप दिले आहे. पंतप्रधानांच्या ‘खादीचा अवलंब करा आणि देशातील गरीबांना बळ द्या’ या आवाहनामुळे खादी फॅशन आणि अभिमानाचे प्रतीक बनली आहे.” असे ते म्हणाले.
तसेच स्वातंत्र्याच्या अमृत काळात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि दूरदृष्टीतून खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने महात्मा गांधींचा वारसा पुढे नेत खादीला नवीन उंचीवर पोहचवले आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने भारत सरकारच्या हर घर तिरंगा अभियानाचा देशभर प्रचार करण्यासाठी एक व्यापक मोहीम देखील चालवली आहे, ज्यामुळे राष्ट्रवादाची भावना बळकट झाली आहे.

कार्यक्रमाचा समारोप कलाकार आणि खादी आणि ग्रामोद्योग आयोगातील कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या उत्साही देशभक्तीपर गीतांच्या सादरीकरणाने झाला. या उत्सवात आयोगाचे अधिकारी, कर्मचारी आणि आमंत्रित पाहुण्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून देशाच्या प्रगतीबद्दल एकता आणि अभिमान व्यक्त केला.
* * *
पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/ श्रद्धा मुखेडकर/ दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2157031)
आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English