रेल्वे मंत्रालय
कोकण रेल्वेने अभिमानाने केला स्वातंत्र्यदिन साजरा
Posted On:
15 AUG 2025 9:00PM by PIB Mumbai
मुंबई, 15 ऑगस्ट 2025
स्वातंत्र्य आणि देशभक्तीचा उत्साहाचा सोहळा आज कोकण रेल्वेने मोठ्या अभिमानाने साजरा केला. भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त, नवी मुंबईतील नेरुळ मधील कोकण रेल विहार इथे आज झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यात कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, संतोष कुमार झा यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. यावेळी त्यांनी रेल्वे संरक्षण दलाच्या (RPF) तुकडीची पाहणीही केली.

याप्रसंगी त्यांनी सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांच्या समर्पणाचे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुक केले. त्यांनी मागच्या वर्षातील काही उल्लेखनीय कामगिरींचा उल्लेखही केला. USBRL प्रकल्पातील कटरा-धरम विभागाचे काम, 11,000 पेक्षा जास्त प्रवासी आणि 3,800 मालगाड्यांचे यशस्वी कार्यान्वयन, रो-रो कार वाहतूक सेवेची सुरुवात, रेल्वेच्या विद्युतीकरणामुळे 144 कोटी रुपयांची बचत, महिला प्रवाशांसाठी पिंक बबल्स सुविधेचा प्रारंभ, 66 हरवलेल्या मुलांची सुटका, 3,860.99 कोटी रुपयांचे प्रकल्प मिळवणे, 79 नवीन पदांची भरती आणि 19 प्रतिष्ठित पुरस्कार मिळवणे अशा गौरवपूर्ण कामगिरीविषयी त्यांनी सांगितले. तांत्रिक आणि कार्यान्वयन विषयक सहकार्य वाढवण्यासाठी 25 हून अधिक सामंजस्य करार (MoUs) करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

कोकण रेल्वेच्या रत्नागिरी आणि कारवार विभागांमध्येही स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. तिथे झालेल्या ध्वजारोहण, सांस्कृतिक कार्यक्रम आणि कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. या निमित्ताने सुरक्षित, कार्यक्षम आणि शाश्वत रेल्वे संपर्क जोडणी उपलब्ध देण्याची, तसेच प्रादेशिक विस्तार आणि राष्ट्रीय प्रगतीमध्ये योगदान देण्याची कोकण रेल्वेची वचनबद्धताही पुन्हा एकदा अधोरेखित झाली.
* * *
पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/ तुषार पवार/ दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2157028)