ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एनटीपीसी पश्चिम क्षेत्र-I प्रकल्पांनी बजावली उत्कृष्ट कामगिरी; नवीन महत्वाचे टप्पे गाठण्याची स्वातंत्र्यदिनी घेतली शपथ

Posted On: 15 AUG 2025 6:15PM by PIB Mumbai

मुंबई, 15 ऑगस्‍ट 2025

 

स्वातंत्र्यदिनानिमित्त, एनटीपीसी पश्चिम क्षेत्र-I (डब्ल्यूआर-I ) मुख्यालय, मुंबई यांनी पवई येथील निवासी संकुलात ध्वजारोहण समारंभाचे आयोजन केले होते. प्रादेशिक कार्यकारी संचालक संतोष कुमार ताखेले यांनी राष्ट्रध्वज फडकावला आणि कर्मचाऱ्यांना संबोधित केले तसेच एनटीपीसीच्या कामगिरीबद्दल अभिमान व्यक्त केला.

ताखेले यांनी अधोरेखित केले की, एनटीपीसी समूहाची 110 कार्यरत वीज केंद्रांमध्ये एकूण 82,977 मेगावॅटची स्थापित क्षमता असून ती 2032 पर्यंत 130 गिगावॅटपर्यंत नेण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये, एनटीपीसी समूहाने 438.7 अब्ज युनिट वीज निर्मिती केली, जी मागील वर्षाच्या तुलनेत 3.95% वाढ दर्शवते. त्यांनी कर्मचारी, सहयोगी संस्था, आयसीएच कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी आणि लेडीज क्लबच्या सदस्यांच्या योगदानाचे कौतुक केले. या स्वातंत्र्यदिनानिमित्त ताखेले यांनी सामूहिक प्रतिज्ञा करण्याचे आवाहन करत नमूद केले की, “स्वच्छ ऊर्जा, पर्यावरणीय व्यवस्थापन आणि शाश्वत विकास ही भविष्यातील पिढ्यांना आपली सर्वात मोठी भेट असेल.” प्रकल्पांची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत;

पश्चिम क्षेत्र -I कामगिरी आणि लक्ष्य

  • आर्थिक वर्ष 2024-25 मधील निर्मिती: 24.25 अब्ज युनिट
  • आर्थिक वर्ष 2025-26 साठी लक्ष्य: 26.455 अब्ज युनिट (RGPPL कडील 1,945 दशलक्ष युनिट सह)

प्रमुख केंद्रांची वैशिष्ट्ये

सोलापूर प्रकल्प

  • आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये ~60% PLF सह 6,830.20 दशलक्ष युनिट्सची निर्मिती
  • फोर्स्ड आउटेजमध्ये लक्षणीय सुधारणा - 5.41% वरून 3.84% पर्यंत घट ; आउटेजची संख्या 24 वरून 10 पर्यंत कमी
  • 18.08 लाख मेट्रिक टन फ्लाय अॅश वापर (81.21 कोटी रुपये महसूल) आणि 1.08 लाख मेट्रिक टन जिप्सम विल्हेवाट (20.59 कोटी रुपये महसूल) साध्य केले, एनटीपीसीमध्ये पटकावला प्रथम क्रमांक
  • दोन्ही FGD युनिट्स कार्यरत आहेत; त्यांना 'वर्षातील पर्यावरण FGD युनिट' पुरस्काराने गौरवण्यात आले.

मौदा प्रकल्प

  • आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये ~70% PLF सह 14,266.12 एमयू निर्मिती
  • युनिट-4 बॉयलरचे ओव्हरहॉलिंग विक्रमी 54 दिवसांत पूर्ण करण्यात आले .
  • 11 मार्च 2025 रोजी एफजीडी गॅस-इन साध्य केले
  • पावसाच्या पाण्याच्या साठवणुकीसाठी पृष्ठभागावरील तलाव पूर्ण झाला (1.8 लाख चौरस मीटर क्षमता).
  • टेरी वॉटर सस्टेनेबिलिटी पुरस्कार आणि जीएमएफ डायमंड पुरस्काराने सन्मानित.

अंता प्रकल्प

  • 5 वर्षात सर्वाधिक उत्पादन - 423 एमयू, गेल्या वर्षीपेक्षा 20% अधिक
  • एनआरएलडीसीला यशस्वी वारंवारता प्रतिसाद दिला.
  • गॅस स्टेशन ओ अँड एम मध्ये उत्कृष्टतेसाठी आयपीएस परिषदेत सुवर्ण शक्ती पुरस्कार मिळाला.
  • कामगारांच्या सुरक्षिततेसाठी क्यूआर-कोड हेल्मेट प्रणाली लागू केली.

कावास प्रकल्प

  • गॅस स्टेशन्समध्ये सलग दोन वर्षे सर्वाधिक डीसी आणि सर्वात कमी एफओ % कायम राखले.
  • 12 मार्च 2025 रोजी ब्लॅक स्टार्ट क्षमतेचा वापर करून ब्लॅकआउट दरम्यान वीज पुनर्संचयित करणारे पहिले स्टेशन बनले.
  • ग्रीनटेक पर्यावरण पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला.

झानोर-गांधार प्रकल्प

  • आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 92.25% डीसी आणि 11.75% पीएलएफसह 676.59 एमयूवीज निर्मिती
  • एपेक्स इंडिया एचआर एक्सलन्स गोल्ड अवॉर्ड आणि ग्रीनटेक पर्यावरण पुरस्कार 2025 ने सीएसआरला गौरवण्यात आले
  • नेट झिरो वॉटर फूटप्रिंट गाठण्यासाठी टाउनशिप रेनवॉटर हार्वेस्टिंग सुविधा सुरू करण्यात आली.

रत्नागिरी गॅस अँड पॉवर (RGPPL)

  • आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 1,443.57 एमयू उत्पादन झाले, जे गेल्या वर्षीपेक्षा 20% अधिक आहे.
  • 23 डिसेंबर 2024 रोजी एनटीपीसीच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांनी टाउनशिप STP चे उद्घाटन केले.
  • IGBC द्वारे 'नेट झिरो वॉटर (ऑपरेशन्स)' 2024 टाउनशिप म्हणून प्रमाणित.
  • 'सर्वोत्तम राष्ट्रीय रेन वॉटर हार्वेस्टिंग सुविधा 2025' म्हणून गौरवले.

सीएसआर उपलब्धी

  • पश्चिम क्षेत्र -I ने 80.63 कोटी रुपये किमतीचे 57 सीएसआर प्रकल्प राबविले.
  • GEM (मुलींचे सक्षमीकरण अभियान) कार्यक्रमांतर्गत 200 हून अधिक विद्यार्थिनींना लाभ झाला.
  • राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्यात आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास आणि पर्यावरणीय शाश्वततेमध्ये लक्षणीय कामगिरी

रेड क्रॉस सोसायटीला पाठिंबा, मोबाईल मेडिकल युनिट्स, STEM लॅब, डिजिटल साक्षरता कार्यक्रम, सैनिक शाळेसाठी वसतिगृह बांधकाम आणि शैक्षणिक संस्थांमध्ये पायाभूत सुविधा विकास यांचा प्रमुख उपक्रमांमध्ये समावेश आहे.

   

 

* * *

पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/ सुषमा काणे/ दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2156917)
Read this release in: English