गृह मंत्रालय
पुणे येथील ‘सीआरपीएफच्या ग्रुप सेंटर’ मध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यक्रम
प्रविष्टि तिथि:
15 AUG 2025 4:30PM by PIB Mumbai
पुणे, 15 ऑगस्ट 2025
पुणे येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ‘ग्रुप सेंटर’मध्ये 79 वा स्वातंत्र्य दिन अत्यंत सन्मानपूर्वक, देशभक्तीपूर्ण वातावरणात आणि उत्साहाने साजरा केला. दिवसभर चाललेल्या कार्यक्रमातून शौर्य, बलिदान आणि ऐक्याचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून वीर जवानांना अभिवादनाने करण्यात झाली. राष्ट्राच्या संरक्षणासाठी प्राणांची आहुती दिलेल्या शूरवीरांना वरिष्ठ अधिकारी, जवान आणि त्यांच्या कुटुंबियांनी आदरांजली वाहिली आणि त्यांच्या बलिदानाची आठवण ठेवत त्यांचे आदर्श पाळण्याचा संकल्प केला.
यानंतर उपमहानिरीक्षक वैभव निंबाळकर यांनी ‘क्वार्टर गार्ड’ येथे राष्ट्रीय ध्वज फडकविला. यावेळी त्यांनी अधिकारी, कर्मचारी आणि जवानांना संबोधित करताना सीआरपीएफ ही “राष्ट्र प्रहरी” म्हणून सदैव देशाच्या एकात्मता, अखंडता आणि अंतर्गत सुरक्षेच्या रक्षणासाठी तत्पर असल्याचे सांगितले. तसेच दलाच्या जवानांचा त्याग, शिस्तबद्धता आणि कर्तव्यनिष्ठेचे कौतुक केले.
72Y5.jpeg)
यानंतर ‘अॅट होम’ समारंभ आयोजित करण्यात आला, ज्यात दलाच्या परंपरेनुसार अधिकाऱ्यांचा सत्कार केला. याप्रसंगी सर्वांसाठी सहभोजनाचे आयोजन केले होते.
स्वातंत्र्यदिनानिमित्त ऐतिहासिक गांधी स्मृती, पुणे येथे सीआरपीएफ बँडचे मोहक सादरीकरण झाले. बँडच्या कलाकारांनी आपल्या मधूर आणि जोशपूर्ण स्वरांनी उपस्थित नागरिक आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या अचूकता, वाद्यमेळ यांच्यामुळे प्रस्तुतीला भरभरून दाद मिळाली. दिवसाचा समारोप सर्व भोजनगृहामध्ये ‘बडा खाना’ कार्यक्रमाने झाला.
GIK2.jpeg)
* * *
पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/पत्रक/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2156866)
आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English