सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अली यावर जंग राष्ट्रीय वाणी आणि श्रवण विकलांगता संस्थेने साजरा केला 79वा स्वातंत्र्यदिन

प्रविष्टि तिथि: 15 AUG 2025 4:05PM by PIB Mumbai

मुंबई, 15 ऑगस्‍ट 2025

 

अली यावर जंग राष्ट्रीय वाणी आणि श्रवण विकलांगता संस्था (दिव्यांगजन) [AYJNISHD(D)], बांद्रा (पश्चिम), मुंबई येथे यावर्षीच्या ‘नया भारत’ या राष्ट्रीय संकल्पनेवर आधारित 79वा स्वातंत्र्यदिन देशभक्तीपूर्ण उत्साहाने साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10 वाजता मुख्य अतिथी श्री. आलोक केजरीवाल यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली, त्यानंतर राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. संस्थेचे संचालक डॉ. सुमन कुमार यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि मुख्य अतिथींचा सत्कार केला.

या प्रसंगी बोलताना डॉ. सुमन कुमार म्हणाले, “स्वातंत्र्यदिन हा स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाला अभिवादन करण्याचा आणि राष्ट्रनिर्मितीसाठी आपली कटिबद्धता दृढ करण्याचा क्षण आहे.” त्यांनी भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयांतर्गत दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. यामध्ये ‘DIVYA व्हॉईस बॉट’ आणि ‘Divya व्हॉट्सॲप चॅट बॉट’ यांसारख्या AI-आधारित व्यासपीठांचा समावेश आहे, ज्या विभागाच्या योजना आणि कार्यक्रमांची माहिती जनसामान्यांपर्यंत अधिक सुलभतेने पोहोचवण्यासाठी विकसित करण्यात आल्या आहेत.

मुख्य अतिथी श्री. आलोक केजरीवाल, जे ISH News चे संस्थापक, यांनी श्रवणदोष असलेल्या समुदायासाठी बातम्या आणि मनोरंजन सुलभ करण्यात प्रेरणादायी योगदान दिले आहे. आपल्या भाषणात, त्यांनी अपार कष्टाने मिळवलेल्या स्वातंत्र्याचे जतन करण्याचे आणि समावेशक, प्रगत भारतासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले.

या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात अधिकारी, विद्यार्थी, वाक् आणि श्रवणदोष असलेले व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले, ज्यामुळे हा एकता आणि देशभक्तीचा खऱ्या अर्थाने स्मरणीय उत्सव ठरला.

 

* * *

पीआयबी मुंबई | यश राणे/ आशिष सांगळे/ दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2156860) आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English