रेल्वे मंत्रालय
पश्चिम रेल्वेने देशभक्तीपूर्ण उत्साहात साजरा केला 79वा स्वातंत्र्यदिन
प्रविष्टि तिथि:
15 AUG 2025 2:40PM by PIB Mumbai
मुंबई, 15 ऑगस्ट 2025
देशाचा 79वा स्वातंत्र्यदिन पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट, मुंबई येथील मुख्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री. विवेक कुमार गुप्ता यांनी राष्ट्रीय ध्वज फडकवला आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) संचलनाचे निरीक्षण केले.
रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा देताना श्री. गुप्ता यांनी स्वातंत्र्यसैनिक, शहीद आणि स्वातंत्र्यलढ्यातील नायकांच्या शौर्य आणि बलिदानाला आदरांजली वाहिली. त्यांनी सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रेरणेतून देशाचे भविष्य घडवण्यासाठी समर्पित प्रयत्न करण्याचे आवाहन केले. पश्चिम रेल्वेच्या अलीकडील यशस्वी कामगिरी आणि महत्त्वपूर्ण टप्पे अधोरेखित करताना त्यांनी कर्मचाऱ्यांना कठोर परिश्रम सुरू ठेवण्यास प्रोत्साहित केले आणि सामूहिक प्रयत्नांमुळे पश्चिम रेल्वे पुढे वाटचाल करेल तसेच भारतीय रेल्वे आणि देशाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान देईल, यावर भर दिला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पश्चिम रेल्वेचे महानिरीक्षक-कम-प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त श्री. अजॉय सादनी यांनी श्री. गुप्ता यांचे स्वागत केले. पश्चिम रेल्वे महिला कल्याण संघटनेच्या (WRWWO) अध्यक्षा सौ. नीता गुप्ता, अतिरिक्त महाव्यवस्थापक श्री. प्रदीप कुमार, विभागांचे प्रमुख आणि वरिष्ठ रेल्वे अधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी सौ. नीता गुप्ता यांनी जगजीवन राम रुग्णालयाला वॉटर प्युरिफायर आणि किटलीसारख्या उपयुक्त वस्तू भेट दिल्या, ज्या पश्चिम रेल्वेच्या प्रधान मुख्य वैद्यकीय संचालक डॉ. कोंडा अनुराधा यांनी स्वीकारल्या. या सोहळ्यात मुख्यालयाच्या प्रांगणात देशभक्तीपर गाणी आणि नृत्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आला.

नंतर श्री. गुप्ता यांनी मुंबई सेंट्रल येथील जगजीवन राम रुग्णालयाला भेट देऊन नूतनीकृत प्रभाग, ऑडिओमेट्री कक्ष आणि नव्याने बांधलेल्या अग्निसुरक्षा मार्गाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला वरिष्ठ रेल्वे अधिकारी आणि रुग्णालय कर्मचारी उपस्थित होते.
* * *
पीआयबी मुंबई | यश राणे/ सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2156819)
आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English