वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रारंभिक टप्प्यातील स्टार्ट अप्सना पाठबळ पुरवून त्यांच्या विस्ताराला मदत करण्याच्या उद्देशाने डीपीआयआयटी ने हिरो मोटोकॉर्प कंपनीशी केला सामंजस्य करार

Posted On: 12 AUG 2025 11:47AM by PIB Mumbai

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (डीपीआयआयटी) प्रारंभिक टप्प्यातील स्टार्ट अप्स उद्योगांना तसेच उद्योजकांना पाठबळ पुरवून त्यांच्या विस्ताराला मदत करण्याच्या उद्देशाने हिरो मोटोकॉर्प कंपनीशी सामंजस्य करार केला आहे. विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या ‘हिरो फॉर स्टार्ट अप्स’ या नवोन्मेष प्रवेगक कार्यक्रमाच्या माध्यमातून हे पाठबळ पुरवण्यात येईल.  

स्टार्ट अप इंडिया उपक्रमांतर्गत, गतिशीलता, स्वच्छ तंत्रज्ञान आणि गहन तंत्रज्ञान यांच्या भविष्याशी संबंधित क्षेत्रांमध्ये कार्यरत स्टार्ट अप्सना डीपीआयआयटी आणि हिरो मोटोकॉर्प कंपनी यांच्यातर्फे संयुक्तपणे मदत करण्यात येईल. या भागीदारीमुळे निवडक स्टार्ट अप उद्योगांना हिरो मोटोकॉर्प कंपनीतील तज्ञांच्या मार्गदर्शनासह कंपनीच्या भारत आणि जर्मनी स्थित जागतिक दर्जाच्या संशोधन आणि विकास सुविधा, कंपनीच्या विक्रेत्यांचे विस्तृत जाळे, पुरवठादार आणि भागीदार यांसारख्या घटकांची विशेष उपलब्धता लाभणार आहे.

या प्रसंगी बोलताना, डीपीआयआयटीचे संयुक्त सचिव संजीव म्हणाले की, हिरो मोटोकॉर्प कंपनीशी केलेल्या भागीदारीमुळे भारतातील गतिशीलतेशी संबंधित समस्या सोडवू शकणाऱ्या उत्पादन-केंद्रित स्टार्ट अप उद्योगांना सक्षम करण्याच्या डीपीआयआयटीच्या कटिबद्धतेला बळकटी मिळेल. “मुलभूत पातळीवरील नवोन्मेषाला औद्योगिक अनुभवाशी जोडून, आम्ही संकल्पनेपासून परिणामांपर्यंतच्या प्रवासाला गती  देण्याचे, विशेषतः उदयोन्मुख तंत्रज्ञाने आणि दुसऱ्या/तिसऱ्या स्तरातील बाजारपेठांसाठी हा वेग प्राप्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे,” ते पुढे म्हणाले.

ही भागीदारी, भारताच्या मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत@2047 या उपक्रमांच्या अधिक विस्तृत उद्दिष्टांशी सुसंगत असलेल्या, नवोन्मेष-प्रणित  औद्योगिक विकासासाठी नवे मार्ग निर्माण करेल अशी अपेक्षा आहे.

***

SushamaKane/SanjanaChitnis/DineshYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2155429) Visitor Counter : 4
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil