संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्वातंत्र्य दिन सोहळ्याचा भाग म्हणून, भारतीय नौदलाचा बँड मुंबईतील विविध महत्त्वाच्या ठिकाणी सादरीकरण करणार

Posted On: 10 AUG 2025 6:52PM by PIB Mumbai

 

2025 च्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याचा भाग म्हणून, भारतीय नौदलाचा बँड मुंबईतील विविध महत्त्वाच्या ठिकाणी सादरीकरण करणार आहे. याअंतर्गत खाली नमूद ठिकाणी संध्याकाळी 5:30 ते 6:30 या वेळेत हे सादरीकरण केले जाईल :

 * 11 ऑगस्ट 2025 रोजी फ्लोरा फाउंटन, फोर्ट

 * 14 ऑगस्ट 2025 रोजी बांद्रा फोर्ट ॲम्फीथिएटर

 * 15 ऑगस्ट 2025 रोजी गेटवे ऑफ इंडिया

बँडचे हे सादरीकरण कार्यक्रम सामान्य जनतेलाही पाहण्यासाठी खुले असतील. देशाच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे आणि राष्ट्राभिमान वृद्धिंगत करणे, हा या सादरीकरणांचा उद्देश आहे. नागरिकांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे प्रोत्साहनपर आवाहनही केले जात आहे.

भारतीय नौदल बँडची सुरुवात 1945 मध्ये झाली होती. त्यावेळी  काही नौदलातील काही मोजक्या संगीतकारांसह या बँडची स्थापना केली गेली होती. गेल्या काही वर्षांत, या बँडने देशभरातील तसेच विशेषतः भारतीय नौदलाची युद्धनौका परदेशी मोहिमांवर असताना जगभरातील श्रोत्यांचे मनोरंजन करत राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवला आहे.

विविधता हे भारतीय नौदलाच्या बँडचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या कार्यक्रमांमध्ये उत्साहवर्धक लष्करी संगीत, सिम्फनी, ओव्हर्चर, कॉन्सर्टो, भारतीय शास्त्रीय संगीत आणि पॉप तसेच लोकसंगीत यांसारख्या अनेक समकालीन प्रकारांचा अंतर्भाव असतो.

***

सुषमा काणे/तुषार पवार/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2154915) अभ्यागत कक्ष : 15
Read this releasein: English