रेल्वे मंत्रालय
विविध प्रमुख रेल्वे सेवांच्या माध्यमातून हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानकात सुव्यस्थित रेल्वे सेवा जोडणी
प्रविष्टि तिथि:
01 AUG 2025 10:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2025
भारतीय रेल्वेने नांदेडमधील हुजूर साहेब स्थानकासोबतची रेल्वे जोडणी सुधारण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे, याअंतर्गत महत्त्वाच्या रेल्वे सेवांचा प्रारंभ आणि त्यांच्या विस्तारकरणाच्या योजनांचा समावेश आहे. याअंतर्गत प्रवाशांच्या सोयीसाठी, 13 जून 2025 पासून 14621 / 14622 फिरोजपूर - हुजूर साहेब नांदेड एक्स्प्रेस ही गाडी सुरू करण्यात आली आहे. ही गाडी छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) - मनमाड मार्गे चालवली जात आहे. याव्यतिरिक्त, 20706 / 20705 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - जालना वंदे भारत एक्स्प्रेस या रेल्वेगाडीची सेवा हुजूर साहेब नांदेडपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याव्यतिरिक्त हुजूर साहेब नांदेड हे अहमदाबाद, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद), मनमाड, कल्याण (मुंबई क्षेत्र) आणि सुरतशी अनुक्रमे 2, 21, 16, 5 आणि 2 जोड्यांच्या रेल्वे सेवांनी जोडले गेले आहे. यासोबतच हुजूर साहेब नांदेड हे हैदराबाद क्षेत्रासोबत 21 जोड्यांच्या आणि अमृतसरसोबत 2 जोड्यांच्या रेल्वे सेवांनी जोडले गेले आहे. हुजूर साहेब नांदेड - मुंबई विभागात सेवा देणाऱ्या 5 नियमित जोड्यांपैकी 17611/17612 हुजूर साहेब नांदेड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राज्यराणी एक्स्प्रेस आणि 17617/17618 हुजूर साहेब नांदेड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तपोवन एक्स्प्रेस या दोन प्रमुख रेल्वे सेवा छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद), मनमाड आणि कल्याण मार्गे चालवल्या जात आहेत.
याशिवाय, वंदे भारत आणि अमृत भारत रेल्वे सेवांसह नवीन रेल्वे सेवा सुरू करणे तसेच सध्याच्या सेवांचा विस्तार करण्याचे काम हे, वाहतुकीची आवश्यकता, कार्यान्वयाची व्यवहार्यता आणि संसाधनांची उपलब्धता अशा घटकांवर अवलंबून असलेले भारतीय रेल्वेच्या निरंतर सुरू असलेल्या प्रक्रियेअंतर्गतचा भाग आहे.
केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत अशोकराव शंकरराव चव्हाण यांनी विचारलेल्या एका अतारांकित प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.
सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2151620)
आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English