संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंह यांनी लष्कराच्या उपप्रमुख पदाचा स्वीकारला पदभार

Posted On: 01 AUG 2025 3:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2025

लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंह यांनी दि. 31 जुलै 2025 रोजी लष्कराच्या उपप्रमुख पदाची पदभार स्वीकारला. यापूर्वी ते लष्कराच्या मुख्यालयात ‘ऑपरेशनल लॉजिस्टिक्स अँड स्ट्रॅटेजिक मूव्हमेंट’ विभागाचे महासंचालक म्हणून कार्यरत होते.

लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंह हे डिसेंबर 1987 मध्ये दि पॅराशूट रेजिमेंटच्या (विशेष दल) चौथ्या बटालियनमध्ये नियुक्त झाले आणि लष्कराच्या सेवेत रुजू झाले होते. ते लखनऊ विद्यापीठाअंतर्गतच्या लखनऊमधील ला मार्टिनिअर महाविद्यालय आणि डेहराडून इथल्या प्रतिष्ठित भारतीय लष्कर अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत.

आपल्या 38 वर्षांच्या गौरवशाली कारकिर्दीत, लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंह यांनी विविध कमांड आणि स्टाफ पदांवर काम केले आहे.

देशासाठी दिलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना अति विशिष्ट सेवा पदक तसेच ‘बार टू सेना पदक’ देवून सन्मानित केले गेले आहे.

सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2151280)