आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महिला आणि मुलांमधील तंबाखू सेवन रोखण्यासाठी उपाययोजना


तंबाखू सेवनात महिलांमध्ये 20.3 टक्के वरून 14.2 टक्के: पर्यंत घट, तर 13 ते 15 वयोगटातील शालेय मुलांमध्ये तंबाखू सेवन 14.6 टक्के वरून 8.5 टक्के पर्यंत घटले : ग्लोबल यूथ टोबॅको सर्व्हे

Posted On: 29 JUL 2025 6:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 जुलै 2025

 

14 वर्षे व त्यावरील वयोगटातील महिलांमध्ये केलेल्या जागतिक प्रौढ तंबाखू सर्वेक्षणानुसार  (GATS) – I (2009-10) आणि GATS – II (2016-17 ) महिलांमध्ये तंबाखूच्या सेवनामध्ये 20.3 टक्के वरून 14.2 टक्के इतकी घट झाली आहे. तसेच, 13 ते 15 वयोगटातील शालेय मुलांमध्ये करण्यात आलेल्या जागतिक प्रौढ तंबाखू सर्वेक्षणानुसार तंबाखू सेवनाचे प्रमाण 14.6 टक्के (GYTS-3, 2009 ) वरून 8.5 टक्के (GYTS-4, 2019) पर्यंत कमी झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

महिला आणि मुलांमध्ये तंबाखू सेवन कमी करण्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने खालील उपाययोजना केल्या आहेत:

  • केंद्र शासनाकडून वर्ष 2003 मध्ये सिगारेट्स आणि इतर तंबाखू उत्पादने (जाहिरातबंदी व व्यापार, उत्पादन, पुरवठा आणि वितरणाचे विनियमन) अधिनियम (COTPA 2003) अंतर्गत एक व्यापक कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी, अल्पवयीन व्यक्तींना तंबाखू उत्पादने विक्रीस बंदी, शैक्षणिक संस्थांच्या 100 मीटर परिसरात तंबाखू विक्रीस बंदी, थेट व अप्रत्यक्ष जाहिरातीस बंदी, तसेच सर्व तंबाखू उत्पादनांच्या पाकिटांवर आरोग्य इशारा  सक्तीने प्रदर्शित करणे अनिवार्य करण्यात आले.
  • त्यानंतर, 2007 मध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम (NTCP) सुरू करण्यात आला असून, यामध्ये तंबाखू वापरास परावृत्त करणे, तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करणे, आणि सीओटीपीए  2003 मधील तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे, यावर भर देण्यात आला आहे.  तंबाखू  दुष्परिणामांविषयी जनजागृतीसाठी मंत्रालयाकडून दरवर्षी 60 दिवसांचे तंबाखूमुक्त युवा अभियान राबवले जाते, ज्यामध्ये युवकांना तंबाखूच्या धोक्यांविषयी माहिती देऊन त्यांना तंबाखूपासून दूर राहण्याची किंवा त्याचे सेवन थांबविण्यासाठी जागृती केली जाते.
  • केंद्र सरकारकडून इलेक्ट्रॉनिक सिगारेट (उत्पादन, निर्मिती , आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण, साठवण आणि जाहिरात) प्रतिबंध अधिनियम, 2019 अंतर्गत इलेक्ट्रॉनिक सिगारेट्स आणि  ज्वलनरहित उत्पादनांवर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री  प्रतापराव जाधव यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात  ही माहिती दिली.

 

* * *

सोनाली काकडे/राज दळेकर/ दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2149861)
Read this release in: English , Urdu , Hindi