भारतीय स्पर्धा आयोग
रेनॉल्ट ग्रुप बी.व्ही. आणि रेनॉल्ट एस.ए.एस द्वारे रेनॉल्ट निसान ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या शेअरहोल्डिंगच्या काही हिस्स्याच्या प्रस्तावित अधिग्रहणाच्या प्रस्तावाला भारतीय स्पर्धा आयोगाने मान्यता दिली आहे.
Posted On:
29 JUL 2025 11:12AM by PIB Mumbai
भारतीय स्पर्धा आयोगाने रेनॉल्ट ग्रुप बी.व्ही. आणि रेनॉल्ट एस.ए.एस. द्वारे रेनॉल्ट निसान ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या काही शेअरहोल्डिंगच्या प्रस्तावित अधिग्रहणाला मान्यता दिली आहे.
प्रस्तावित अधिग्रहण प्रक्रियेत रेनॉल्ट ग्रुप बी.व्ही. (अधिग्रहण करणारी पहिली कंपनी ) आणि त्यांचे नॉमिनी, रेनॉल्ट एस.ए.एस. (अधिग्रहण करणारी दुसरी कंपनी) यांच्याकडून रेनॉल्ट निसान ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (अधिग्रहण केली जाणारी कंपनी) मध्ये निसान मोटर कंपनी लिमिटेड जपान (निसान) आणि निसान ओव्हरसीज इन्व्हेस्टमेंट्स बी.व्ही. (निसान ओव्हरसीज) या संयुक्त विक्रेत्यांकडे असलेले इक्विटी शेअर्स आणि पूर्ण मूल्य दिलेले झीरो -कूपन नॉन-कन्व्हर्टेबल रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स यांचे संपादन केले जाणार आहे.
रेनॉल्ट ग्रुप बी.व्ही.ही अधिग्रहण करणारी पहिली कंपनी प्रवासी कार, हलकी व्यावसायिक वाहने आणि इलेक्ट्रिक वाहनांचे डिझाइन, उत्पादन आणि विपणन करते आणि जगभरात गतिशीलता सेवा प्रदान करते.
रेनॉल्ट एस.ए.एस. ही अधिग्रहण करणारी दुसरी कंपनी मोटार वाहनांचा अभ्यास, बांधकाम, व्यापार, दुरुस्ती, देखभाल करते तसेच मोटार वाहने भाड्याने देते. यामध्ये वाहनांच्या बांधकामासाठी किंवा परिचालनासाठी वापरल्या जाणाऱ्या भागांचा आणि उपकरणांचा अभ्यास आणि उत्पादन देखील समाविष्ट आहे. रेनॉल्ट एस.ए.एस ही कंपनी वर उल्लेख केलेल्या व्यावसायिक सेवा पुरवण्यात देखील कार्यरत आहे. रेनॉल्ट ग्रुप बी.व्ही.ही आणि रेनॉल्ट एस.ए.एस. या दोन्हीही कंपन्या रेनॉल्ट एसए (रेनॉल्ट) द्वारे नियंत्रित केले जातात आणि ते रेनॉल्ट ग्रुपचा भाग आहेत.
रेनॉल्ट निसान ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी प्रवासी वाहनांचे उत्पादन आणि घटकांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त असून ट्रान्समिशन, वाहनांचे भाग आणि रेनॉल्ट आणि निसान या कंपन्यांना संबंधित सेवा पुरवते.
आयोग आपला सविस्तर आदेश नंतर जारी करणार आहे.
***
SonalTupe/BhaktiSontakke/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2149653)