वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
महाजाल नियोजन गटाच्या 97 व्या बैठकीत रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांचे मूल्यमापन
बहुविध संचारसंपर्क, दळणवळण कार्यक्षमता आणि आर्थिक परिणामांसाठी पाच प्रकल्पांचे मूल्यमापन
Posted On:
23 JUL 2025 9:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जुलै 2025
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (एम ओ आर टी एच) आणि रेल्वे मंत्रालय (एम ओ आर) यांनी महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांचे मूल्यमापन करण्यासाठी महाजाल नियोजन गटाची (एनपीजी) 97 वी बैठक आज आयोजित केली होती. या बैठकीत पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखड्याच्या (पीएमजीएस एनएमपी) मुख्य तत्त्वांशी सुसंगत असणारी बहुविध जोडणी आणि दळणवळण कार्यक्षमता वाढविण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.
एनपीजीने एकूण पाच प्रकल्पांचे मूल्यमापन केले, ज्यामध्ये तीन एमओआरटीएचचे आणि दोन एमओआरचे होते. यापैकी दोन प्रकल्प ब्राऊनफील्ड क्षेत्रातील तर तीन ग्रीनफील्ड क्षेत्रातील आहेत. प्रत्येक प्रकल्पाचे मूल्यांकन पीएम गतिशक्तीच्या एकात्मिक बहुआयामी पायाभूत सुविधा, आर्थिक आणि सामाजिक पेरांसोबत अखेरच्या टप्प्यातील संचारसंपर्क आणि आंतर-विभागीय समन्वय या तत्त्वांच्या अनुरूपतेसाठी केले गेले.
या उपक्रमांमुळे दळणवळण कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढेल, प्रवासाचा वेळ कमी होईल आणि ते ज्या प्रदेशात सेवा देतात त्या प्रदेशात लक्षणीय सामाजिक-आर्थिक फायदे मिळतील.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (एमओआरटीएच)
1. द्वारका बोगदा
या प्रस्तावित 6-पदरी भूमिगत बोगद्यामुळे नेल्सन मंडेला मार्गाचा गुडगाव आणि द्वारकापर्यंत विस्तार होईल, ज्यामुळे शिवमूर्तीजवळील एका महत्त्वपूर्ण आंतरबदलाद्वारे राष्ट्रीय महामार्ग-8 आणि द्वारका एक्सप्रेसवे दरम्यान एकसंध एकीकरण होऊ शकेल.
2. पाटणा-पूर्णिया 6-पदरी एक्सप्रेसवे
या प्रस्तावित 244.930 किमी लांबीच्या, 6-पदरी एक्सप्रेसवेचे उद्दिष्ट पाटणा आणि पूर्णिया दरम्यान अतिजलद इंटरमोडल संचारसंपर्क कॉरिडॉर स्थापित करणे आहे.
3. सूरतगढ-श्री गंगानगरच्या विद्यमान दुपदरी मार्गाचे चौपदरी मार्गासाठी रुंदीकरण
या प्रकल्पात सूरतगढ ते राजस्थानमधील श्री गंगानगर या राष्ट्रीय महामार्ग-62 च्या 75.550 किमी लांबीच्या भागाचे चौपदरी मार्गासाठी रुंदीकरण करण्याचा समावेश आहे.
रेल्वे मंत्रालय (एम ओ आर)
4. बद्दी-घनौली दरम्यान नवीन रेल्वेमार्ग
रेल्वे मंत्रालयाने बद्दी आणि घनौली दरम्यान 25.396 किमी लांबीचा नवीन रेल्वेमार्ग प्रस्तावित केला आहे, जो हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधून जातो.
5. कनालूस आणि ओखा स्थानकांमधील दुहेरीकरण
या प्रस्तावात गुजरातमधील कनालूस जंक्शन आणि ओखा दरम्यानच्या 141.117 किमी लांबीच्या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण समाविष्ट आहे.
उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे (डीपीआयआयटी) सहसचिव पंकज कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
* * *
शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2147599)