श्रम आणि रोजगार मंत्रालय
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांसाठी रोजगाराकरिता विशेष उपक्रम आणि अर्थसंकल्पीय साहाय्य
Posted On:
21 JUL 2025 9:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जुलै 2025
2025-26 या आर्थिक वर्षात श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या विविध योजनांतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समुदायांसाठी केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदींची माहिती परिशिष्टात दिली आहे. त्याशिवाय श्रम आणि रोजगार मंत्रालय 25 राष्ट्रीय करिअर सेवा केंद्रांच्या माध्यमातून "एससी/एसटी रोजगार शोधक कल्याण योजना" राबवत आहे. व्यावसायिक मार्गदर्शन, करिअर समुपदेशन, संगणक प्रशिक्षण आणि भरती-पूर्व प्रशिक्षण देऊन एससी/एसटी समुदायातील रोजगार शोधणाऱ्यांची रोजगारक्षमता वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. 2025-26 वर्षासाठी या योजनेसाठी रु. 20.61 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, संबंधित संस्थांसोबत नियमित बैठका घेतल्या जातात.
पंतप्रधानांच्या पाच योजनांच्या पॅकेजचा भाग म्हणून ईएलआय योजना केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये घोषित करण्यात आली. या योजनेचा उद्देश 4.1 कोटी तरुणांना रोजगार, कौशल्य विकास आणि इतर संधी उपलब्ध करून देणे हा आहे, ज्यासाठी एकूण रु. 2 लाख कोटी रुपयांचे बजेट निश्चित करण्यात आले आहे. रु. 99,446 कोटी रुपयांच्या खर्चासह, ईएलआय योजनेचे उद्दिष्ट पुढील 2 वर्षांत देशात 3.5 कोटींपेक्षा जास्त रोजगार निर्माण करणे आहे (त्यापैकी 1.92 कोटी रोजगार प्रथमच नोकरी शोधणाऱ्यांसाठी असतील).
तसेच कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (MSDE) प्रधानमंत्री कौशल विकास योजना (PMKVY), जन शिक्षण संस्थान (JSS), राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना (NAPS) आणि कारागीर प्रशिक्षण योजना (CTS) यांसारख्या विविध प्रमुख योजनांद्वारे देशभरातील समाजातील सर्व स्तरांना कौशल्य प्रशिक्षण (कौशल्य विकास, पुनः कौशल्य आणि अद्ययावत कौशल्य) प्रदान करते.
सरकारद्वारे राबवल्या जाणाऱ्या विविध रोजगार निर्मिती योजना/कार्यक्रमांची सविस्तर माहिती
[https://dge.gov.in/dge/schemes_programmes](https://dge.gov.in/dge/schemes_programmes) या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
ही माहिती आज (21 जुलै 2025 रोजी) लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात श्रम आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी दिली.
ANNEXURE
ANNEXURE REFERRED TO IN REPLY TO PARTS (a) TO (e) OF LOK SABHA UNSTARRED QUESTION NO. 190 FOR ANSWER ON 21.07.2025 REGARDING "SPECIAL INITIATIVES AND BUDGETARY SUPPORT FOR EMPLOYMENT OF SC, ST, OBC AND MINORITIES”.
Sl. No.
|
Name of the Scheme
|
Budget Estimates 2025-26
(Rs. in Crores)
|
1
|
Labour and Employment Statistical System (LESS)
|
72.72
|
2
|
Labour Welfare Scheme (LWS)
|
50.68
|
3
|
Employees’ Pension Scheme (EPS), 1995
|
11250.00
|
4
|
Social Security for Tea Plantation Workers in Assam
|
66.87
|
5
|
Pradhan Mantri Shram Yogi Maandhan (PMSYM) Yojana
|
244.02
|
6
|
National Pension Scheme (NPS) for Traders & Self-Employed Persons
|
5.10
|
7
|
e-Shram Portal - National Database of Unorganized Workers
|
27.80
|
8
|
Rehabilitation of Boded Labour
|
6.00
|
9
|
Coaching and Guidance for SC, ST and OBCs
|
20.61
|
10
|
National Career Service (NCS)
|
77.00
|
11
|
New Employment Generation Scheme (NEGS) – ELI
|
20000.00
|
|
Total
|
31820.80
|
सुवर्णा बेडेकर/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2146633)