सांस्कृतिक मंत्रालय
संग्रहालये अथवा सांस्कृतिक ठेव्यांच्या डिजिटायजेशनसाठी आर्थिक मदत
Posted On:
21 JUL 2025 7:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जुलै 2025
सांस्कृतिक मंत्रालयातर्फे संग्रहालय अनुदान योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत नवीन संग्रहालय स्थापन करणे अथवा वर्तमानातील संग्रहालयाचा विस्तार, संग्रहालयातील संग्रहाचे डिजिटायजेशन आणि क्षमता विकास तसेच संग्रहालय कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण यासाठी अनुदान दिले जाते. ही संग्रहालये केंद्र अथवा राज्य सरकारची, सार्वजनिक आस्थापनांची, समाजाची, स्वायत्त मंडळांची, स्थानिक प्रशासनाची तसेच विभागीय, राज्य व जिल्हा स्तरावरील विश्वस्त संस्थांची असू शकतात. संग्रहालय अनुदान योजनेअंत्रगत आर्थिक मदत मिळविण्यासाठी संग्रहालयांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह विहीत नमुन्यातील प्रत्साव मंत्रालयाकडे पाठविणे आवश्यक आहे.
संग्रहालय अनुदान योजना कार्यान्वित झाल्यापासून म्हणजेच 2013-14 पासून संग्रहालयांच्या डिजिटायजेशनसाठी राज्यांना दिलेल्या (राज्य शासनाच्या, स्थानिक प्रशासनाच्या, विद्यापीठाच्या, एनजीओच्या किंवा विश्वस्त संस्थेच्या संग्रहालयासाठी) निधीचे आणि मंजूक केलेल्या प्रस्तावांचे तपशील परिशिष्ट – 1 मध्ये उपलब्ध आहेत.
केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
सुवर्णा बेडेकर/सुरेखा जोशी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2146556)