नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताची नवीकरणीय ऊर्जा क्रांती: अजैविक इंधन स्त्रोत आता देशाच्या निम्म्या ग्रीडला पुरवतात वीज


स्वच्छ ऊर्जा क्षमतेचा 50% टप्पा पाच वर्षे आधी गाठला; शाश्वत विकासासाठी जागतिक मानक निश्चित

Posted On: 14 JUL 2025 10:44PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 जुलै 2025

 

भारताने आपल्या ऊर्जा संक्रमण प्रवासात एक मोलाची कामगिरी पार केला आहे. देशाची 50 % स्थापित विद्युत क्षमता आता अजैविक इंधन  स्रोतांद्वारे निर्माण केली जात आहे. हा टप्पा पॅरिस करारांतर्गत निश्चित केलेल्या राष्ट्रीय निर्धारीत योगदानांनुसार (एनडीसीएस) 2030 पर्यंत गाठायचा होता, पण भारताने तो पाच वर्षे आधीच गाठला आहे. हा महत्त्वपूर्ण टप्पा देशाच्या हवामान बदल आव्हानावरील  कृती आणि शाश्वत विकासातील दृढ बांधिलकीचे प्रतीक आहे. तसेच, भारताचा स्वच्छ ऊर्जा संक्रमण प्रवास केवळ वास्तवात उतरलेला नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वेगाने पुढे जात आहे, याचेही संकेत देत आहे.

नवी आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, “हवामान बदलाचे उपाय शोधणाऱ्या जगात भारत मार्ग दाखवत आहे. 2030 च्या लक्ष्याच्या पाच वर्षे आधी अजैविक इंधन क्षमतेचा 50% टप्पा गाठणे हे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व भारताच्या हरित परिवर्तनाचा आधारस्तंभ ठरले आहे, सोबतच आत्मनिर्भर आणि शाश्वत भविष्यासाठीचा मार्ग देखील  तयार करत आहे.”

2030 पूर्वीच 50% अजैविक इंधन स्थापित क्षमतेचा टप्पा गाठणे हे भारताच्या महत्त्वाकांक्षा, नवोपक्रम आणि शाश्वत विकासातील बांधिलकीचे प्रतीक आहे. विकास आणि डीकार्बोनायझेशन (कार्बन उत्सर्जन कमी करणे) ही परस्परविरोधी उद्दिष्टे नसून ती एकमेकांना पूरक ठरू शकतात, हे यातून सिद्ध होते. 

 

* * *

S.Kakade/G.Deoda/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2144725)
Read this release in: English , Urdu , Hindi , Odia , Kannada