आयुष मंत्रालय
आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते ‘शल्यकॉन 2025’ या तिसऱ्या राष्ट्रीय परिषदेचे अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत उद्घाटन
Posted On:
14 JUL 2025 10:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जुलै 2025
सुश्रुत जयंतीच्या निमित्ताने, शल्य तंत्र या विषयावर आधारित ‘शल्यकॉन 2025’ या तिसऱ्या राष्ट्रीय परिषदेचे आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी आज उद्घाटन केले. नवी दिल्ली स्थित अखिल भारतीय आयुर्वेद संस्था – एआयआयए इथे हा कार्यक्रम झाला.
एआयआयएमधील शल्य तंत्र विभाग आणि राष्ट्रीय सुश्रुत संघटना (एनएसए) यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आली होती. ही परिषद एनएसए च्या 25 व्या वार्षिक संमेलनाचा एक भाग होती. या कार्यक्रमात भारतासह नेपाळ, श्रीलंका यांसारख्या शेजारील देशांतील 500 हून अधिक विद्वान, आयुर्वेदतज्ज्ञ व शल्यविशारद, संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.

कार्यक्रमात बोलताना प्रतापराव जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीच्या अनुषंगाने आयुर्वेद संशोधन अधिक मजबूत करण्याची गरज अधोरेखित केली. ते म्हणाले, “संशोधनाला प्रोत्साहन देणे हे आपल्या सर्वोच्च प्राधान्यक्रमावर असले पाहिजे. वैज्ञानिक दृष्टीकोनातून पारंपरिक वैद्यकीय पद्धतींची परिणामकारकता आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध करता येईल. भारत सरकारने आयुर्वेदिक चिकित्सकांना 39शस्त्रक्रिया पद्धती व 19 इतर पद्धती वापरण्यासाठी मान्यता दिली आहे.” शस्त्रक्रियांच्या प्रक्रियांचे प्रमाणिकरण हे उपचारांची गुणवत्ता व सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अत्यावश्यक असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
या कार्यक्रमात 13 व 14 जुलै रोजी 10 लॅप्रोस्कोपिक/एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया आणि 16 गुदद्वाराशी संबंधित शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्या. तसेच परिषदेमध्ये वैज्ञानिक सत्रे, फलक सादरीकरण आणि शल्य तंत्रातील नवकल्पना व प्रमाणिकरणाबाबत तज्ज्ञांच्या चर्चा आयोजित करण्यात आल्या होत्या.
* * *
S.Kakade/R.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2144724)