अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथे “अखंड व्यापारासाठी वैज्ञानिक उत्कृष्टता” या विषयावरील व्यापार सुविधा परिषद 2025 चे उद्घाटन

Posted On: 11 JUL 2025 9:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 जुलै 2025


केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज नवी दिल्ली येथे “अखंड  व्यापारासाठी वैज्ञानिक उत्कृष्टता” या विषयावरील व्यापार सुविधा परिषद 2025 चे उद्घाटन केले.

अशा प्रकारची ही पहिलीच परिषद  केंद्रीय महसूल नियंत्रण प्रयोगशाळा (सीआरसीएल), केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (सीबीआयसी) द्वारे आयोजित केली.

परिषदेचे उद्घाटन करताना, प्रमुख पाहुणे पंकज चौधरी यांनी आर्थिक विकास , अनुपालन आणि व्यवसाय सुलभतेला प्रोत्साहन  देणारी आधुनिक आणि कार्यक्षम चाचणी व्यवस्था तयार करण्याप्रति केंद्र सरकारच्या वचनबद्धतेवर भर दिला.

परिषदेला  400  हून अधिक प्रतिनिधी आणि सहभागी उपस्थित होते. या परिषदेत महसूल विभाग, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (सीबीआयसी) आणि त्याच्या संलग्न क्षेत्रीय संघटनांमधील वरिष्ठ मान्यवर, भागीदार सरकारी संस्थांचे अधिकारी , विविध व्यापारी संघटना  आणि त्यांचे प्रतिनिधी, प्रतिष्ठित संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

परिषदेदरम्यान आयोजित  संवादात्मक सत्रांमुळे व्यापार, उद्योग सहभागी, सीआरसीएल अधिकारी, नियामक संस्था आणि क्षेत्रीय रचनांसोबत विविध नियामक आणि प्रक्रियात्मक आवश्यकतांवर चर्चा करण्याची संधी मिळाली. या तांत्रिक चर्चेने सर्व हितधारकांना प्रामुख्याने  समस्या समजून घेण्याची आणि त्यांचे निराकरण करण्याची, स्पष्टीकरण मिळवण्याची आणि विश्वास, प्रतिसाद आणि सहकार्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी सुधारणा प्रस्तावित करण्याची संधी उपलब्ध करून दिली.

चाचणीसाठी लागणारा वेळ कमी करणे, चाचणी संबंधी पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि उन्नतीकरण, एकात्मिक प्रयोगशाळा सुविधा प्रशिक्षण आणि क्षमता निर्मिती , प्रयोगशाळेच्या नेटवर्कचा विस्तार आणि आधुनिकीकरण, संशोधन आणि विकास  उपक्रम, मनुष्यबळ मजबुतीकरणावर लक्ष केंद्रित करणे, प्रमुख हितधारकांच्या गटाची स्थापना करण्याप्रती वचनबद्धता हे परिषदेचे प्रमुख निष्कर्ष आहेत.

केंद्रीय महसूल नियंत्रण प्रयोगशाळा (सीआरसीएल)

केंद्रीय महसूल नियंत्रण प्रयोगशाळेने (सीआरसीएल)1912 मध्ये कलकत्ता येथे इम्पीरियल कस्टम्स लॅबोरेटरीची स्थापना करून आपला प्रवास सुरू केला, जो कसौली येथील त्याहूनही जुन्या उत्पादन शुल्क प्रयोगशाळेवर आधारित होता. 1939 मध्ये, डॉ. एच. बी. डुनिक्लिफ यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली नवी दिल्ली येथे सीआरसीएलची औपचारिक स्थापना झाली. तेव्हापासून, ती भारताच्या महसूल आणि सीमाशुल्क परिसंस्थेचा एक वैज्ञानिक आधारस्तंभ म्हणून उदयास आली आहे जी वर्गीकरणात अचूकता, व्यापारात सचोटी  आणि अंमलबजावणीवर विश्वास सुनिश्चित करते.

N.Chitale/S.Kane/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2144153)
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil