दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त टपाल विभागाच्या वतीने विशेष टपाल तिकीटाचे प्रकाशन
Posted On:
09 JUL 2025 10:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जुलै 2025
भारताच्या टपाल विभागाने, आज दिल्लीतील सिरी फोर्ट सभागृहात आयोजित एका भव्य कार्यक्रमात, श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त एक विशेष स्मृती टपाल तिकीटाचे प्रकाशन केले.
हा कार्यक्रम केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने आयोजित केला गेला होता. या कार्यक्रमात देशभक्तीपर वाद्यवृंदाचे सादरीकरण तसेच श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे जीवन, वारसा आणि योगदानावर आधारित प्रदर्शनाचा अंतर्भाव असलेला एक उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आला.

केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांच्या सन्मानीय उपस्थितीत या स्मृती टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले.

हे स्मृती टपाल तिकीट आणि संबंधित टपाल तिकीट संग्रह (Philatelic Items) आता देशभरातील फिलॅटेलिक ब्युरोमध्ये आणि www.epostoffice.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध असतील.
S.Bedekar/T.Pawar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2143593)