विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
सीएसआयआर-आयजीआयबी येथे 'नॅशनल बायोबँक'/'राष्ट्रीय जैवबँक' आणि भारताच्या स्वतःच्या दीर्घ कालावधीतील लोकसंख्या माहिती अभ्यासाचे डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते उद्घाटन
Posted On:
06 JUL 2025 5:58PM by PIB Mumbai
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (CSIR) उपाध्यक्ष डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज राजधानीत सीएसआयआर-इन्स्टिट्यूट ऑफ जीनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी (IGIB) येथे अत्याधुनिक फेनोम इंडिया 'नॅशनल बायोबँक''चे उद्घाटन केले. नव्याने सुरू झालेल्या या सुविधेमुळे भारताला दीर्घ कालावधीत संकलित केलेल्या व्यक्ती किंवा गटाविषयीच्या आरोग्य संशोधनाची संकलित माहिती तयार करण्यासाठी आणि भविष्यात सक्षम वैयक्तिककृत उपचार पद्धती तयार करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

देशभरातील 10,000 व्यक्तींकडून व्यापक जीनोमिक(जनुकीय), जीवनशैली आणि वैद्यकीय माहिती गोळा करून देशव्यापी समवयस्क व्यक्तींच्या(cohort)अभ्यासाचा कणा म्हणून नॅशनल बायोबँक काम करेल. सोव्हिएत संघाच्या बायोबँक प्रारुपापासून प्रेरणा घेत, त्याची भारतीय आवृत्ती देशाच्या भौगोलिक, वांशिक आणि सामाजिक आर्थिक पार्श्वभूमीतील विलक्षण विविधतेला सामावून घेण्यासाठी तयार करण्यात आली आहे. या पुढाकारामुळे लवकर निदान करण्यास प्रोत्साहन मिळेल तसेच लक्ष्यित उपचारांमध्ये सुधारणा आणि मधुमेह, कर्करोग, हृदयरोग आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार यांसारख्या गुंतागुंतीच्या आजारांशी आणि दुर्मिळ अनुवंशिक जटील विकारांशी लढण्यास बळकटी मिळेल असा संशोधकांना विश्वास वाटतो.
डॉ. जितेंद्रसिंह यांनी IGIBमधील शास्त्रज्ञ आणि संशोधकांना संबोधित करताना "आज, प्रत्येक भारतीयाला त्यांच्या अनुवंशिक रचना, जीवनशैली आणि पर्यावरण यांच्यानुसार वैयक्तिककृत उपचार मिळू शकतील अशा भविष्याचे आश्वासन आम्ही देऊ शकतो" असे सांगितले. "वैयक्तिकृत आरोग्यसेवेच्या दिशेन होणारे संक्रमण केवळ लिखित रुपात अथवा सैद्धांतिक न राहाता ते स्वदेशी नवोपक्रमांमुळे प्रत्यक्षात येत आहे" असेही ते म्हणाले.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी प्रतिजैविक प्रतिकार (AMR) आणि औषधे विकास यांसारख्या क्षेत्रात संशोधन संस्था आणि जैवतंत्रज्ञानासारखे सरकारी विभाग यांना सखोल सहकार्य करण्याचे आवाहन केले. "संशोधन प्रयोग शाळेच्या पलीकडे वाढले पाहिजे आणि त्यांनी बाजारात ग्राहक आणि समाजात लाभार्थी शोधले पाहिजेत" असेही त्यांनी नमूद केले. फिनोम इंडिया प्रकल्प, ज्या अंतर्गत बायोबँक सुरू करण्यात आली आहे, जी दीर्घकालिक आणि माहिती समृद्ध अभ्यास म्हणून तयार करण्यात आली आहे, जी अनेक वर्षांपासून व्यक्तींच्या आरोग्याच्या दृष्टीकोनाचा मागोवा घेते आहे. यामुळे शास्त्रज्ञांना भारतीय संदर्भाने, रोगाचा आकृतीबंध, जनुक-पर्यावरण परस्परसंवाद आणि उपचारांना प्रतिसादाचा वेध घेण्यास मदत करेल.

***
S.Patil/VSS/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2142776)