महिला आणि बालविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रांची येथे सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला आणि बाल विकास संस्थेच्या नव्या प्रादेशिक केंद्राचे उद्घाटन

Posted On: 04 JUL 2025 6:20PM by PIB Mumbai

 

महिला आणि बाल विकास मंत्रालयाने एक महत्त्वाचा टप्पा गाठत झारखंडमधील रांची येथे सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला आणि बाल विकास संस्था (एसपीएनआयडब्ल्यूसीडी) - पूर्वीची राष्ट्रीय जन सहकार्य आणि बाल विकास संस्थेच्या (एनआयपीसीसीडी) नव्या प्रादेशिक केंद्राचे उद्घाटन केले.

केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते या प्रादेशिक केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते फलकाचे अनावरण आणि दीपप्रज्वलनाने झाली. समारंभाच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये प्रशिक्षणार्थी मुलींशी संवाद, वैयक्तिक अनुभव कथन आणि व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमातील यशस्वी उमेदवारांना नेमणूक प्रमाणपत्रांचे वितरण यांचा समावेश होता. या कार्यक्रमात राष्ट्रीय जन  सहकार्य आणि बाल विकास संस्थेचे सावित्रीबाई फुले संस्थेत परिवर्तीत होण्यापर्यंतचा प्रवास, स्थानिक पोषण पद्धतींचे महत्त्व आणि मंत्रालयाच्या प्रमुख योजना दर्शविणारे लघुपट दाखवण्यात आले. संस्थेचा नवीन दृष्टिकोन आणि ओळख यांचे प्रतीक असलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरणही यावेळी करण्यात आले.

सावित्रीबाई फुले जी यांच्या आदर्शांनी प्रेरित होऊन, हे नवीन केंद्र केवळ शिक्षण आणि प्रशिक्षणाचे केंद्र म्हणून काम करणार नाही तर नवोन्मेष, संशोधन आणि धोरणनिर्मितीचे केंद्र म्हणूनही उदयास येईल, असे महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या राज्यमंत्री सावित्री ठाकूर  याप्रसंगी म्हणाल्या .

या नवीन केंद्राचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे बालकांना  मार्गदर्शन आणि समुपदेशन विषयक प्रगत पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे, तसेच आघाडीच्या आरोग्य सेवकांसाठी सुधारित प्रशिक्षण मॉड्यूलची रचना करण्यात आली आहे. या उपक्रमांमुळे या प्रदेशात कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी लक्षणीय प्रमाणात वाढतील अशी वाढ अपेक्षा आहे.

***

S.Kane/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2142364) Visitor Counter : 3
Read this release in: Tamil , English , Urdu , Hindi