रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

तामिळनाडूमध्ये 1853 कोटी रुपये खर्चासह 4-पदरी परमकुडी–रामनाथपुरम् (एनएच-87) खंडाच्या बांधकामास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 01 JUL 2025 4:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 जुलै 2025

 

केंद्रीय मंत्रिमंडळाने तामिळनाडूमध्ये 4 -पदरी परमकुडी ते रामनाथपुरम् (एनएच-87) खंडाच्या  बांधकामास मंजुरी दिली आहे. सुमारे 46.7 किलोमीटर लांबीचा हा मार्ग हायब्रिड अ‍ॅन्युइटी मोड वर विकसित केला जाणार असून त्यासाठी एकूण 1,853 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

सध्या,  मदुराई, परमकुडी, रामनाथपुरम्, मंडपम, रामेश्वरम् आणि धनुष्कोडी यांमधील संपर्क विद्यमान राष्ट्रीय महामार्ग (एनएच-87) व राज्य महामार्गांवरील दोन पदरी रस्त्यांवर अवलंबून  आहे. या मार्गावर वाहतुकीचा भार अधिक असून विशेषतः लोकवस्ती जास्त असलेल्या भागांत व प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होते. ही अडचण दूर करण्यासाठी, (एनएच-87) च्या परमकुडी ते रामनाथपुरम् या मार्गाचे  चौपदरी मार्गात  रूपांतर केले जाणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल, सुरक्षितता वाढेल, आणि परमकुडी, सथिरकुडी, अचुंदनवायल आणि रामनाथपुरम् यांसारख्या झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरांच्या वाहतुकीच्या गरजा पूर्ण होतील.

हा प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग एनएच-38, एनएच-85, एनएच-36, एनएच-536 आणि एनएच-32 या 5 प्रमुख राष्ट्रीय महामार्गांशी तसेच एसएच -47, एसएच-29 आणि एसएच-34 या 3 राज्य महामार्गांशी जोडला जाणार आहे. त्यामुळे दक्षिण तामिळनाडूतील महत्त्वाच्या आर्थिक, सामाजिक व लॉजिस्टिक केंद्रांशी अखंड जोडणी सुनिश्चित होणार आहे. या रस्त्यामुळे मदुराई व रामेश्वरम् येथील दोन मोठ्या रेल्वे स्थानकांशी, मदुराई विमानतळाशी, तसेच पांबन व रामेश्वरम् येथील दोन लघु बंदरांशी दळणवळण सुलभ होणार असून माल व प्रवासी वाहतुकीच्या गतीला चालना मिळणार आहे.

या प्रकल्पामुळे प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना मिळेल, धार्मिक व आर्थिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या केंद्रांतील जोडणी भक्कम होईल, रामेश्वरम् व धनुष्कोडीच्या पर्यटनास प्रोत्साहन मिळेल, तसेच व्यापार व औद्योगिक विकासासाठी नवीन संधी निर्माण होतील. या प्रकल्पामुळे सुमारे 8.4 लाख मनुष्य-दिन  प्रत्यक्ष तर  10.45 लाख मनुष्य-दिन  अप्रत्यक्ष  रोजगार निर्माण होतील, आणि परिसराचा विकास, प्रगती व समृद्धीच्या नव्या संधी निर्माण होतील.

Map of Corridor

image.jpeg

प्रकल्प माहिती : चौपदरी परमकुडी -  रामनाथपुरम् महामार्ग विभाग

वैशिष्ट्य

तपशील

प्रकल्पाचे नाव

चौपदरी परमकुडी - रामनाथपुरम् मार्ग

कॉरिडॉर  

मदुराई – धनुष्कोडी मार्गिका (एनएच -87)

लांबी

46.7 कि.मी.

एकूण नागरी कामांचा खर्च

997.63 कोटी

भूसंपादन खर्च 

340.94 कोटी

एकूण भांडवली खर्च 

1,853.16 कोटी

विकास पद्धत 

हायब्रिड अ‍ॅन्युइटी मोड

जोडलेले प्रमुख राष्ट्रीय महामार्ग 

एनएच-38, एनएच-85, एनएच-36, एनएच-536 आणि एनएच-32

जोडलेले राज्य महामार्ग   

एसएच -47, एसएच-29 आणि एसएच-34

जोडणी असलेले आर्थिक / सामाजिक / वाहतूक केंद्रे   

 

विमानतळ : मदुराई, रामनाड (नेव्हल एअर स्टेशन) 

रेल्वे स्थानके : मदुराई, रामेश्वरम्

लघु बंदरे : पांबन, रामेश्वरम्

महत्त्वाची शहरे / नगरांशी जोडणी

मदुराई, परमकुडी, रामनाथपुरम्, रामेश्वरम्

रोजगार निर्मितीची क्षमता 

8.4 लाख श्रम दिवस प्रत्यक्ष आणि 10.05 लाख श्रम दिवस अप्रत्यक्ष

आर्थिक  वर्ष 2024-25 मधील सरासरी दररोजचा  वाहतूकभार

अंदाजे 12,700 प्रवासी वाहन

 

 

* * *

S.Kane/R.Dalekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2141242)