नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

त्याग आणि शिस्त हाच  खऱ्या देशभक्तीचा पाया  : सर्वानंद सोनोवाल

प्रविष्टि तिथि: 29 JUN 2025 6:52PM by PIB Mumbai

 

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी, जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज प्रजापिता ब्रह्मकुमारी यांच्या सुवर्णमहोत्सवी उद्घाटन समारंभाला हजेरी लावली.संस्थेच्या,अध्यात्म, सामाजिक सौहार्द आणि चरित्र्य निर्माणामध्ये रुजलेल्या पन्नास वर्षांच्या निःस्वार्थ सेवेचे कौतुक त्यांनी केले.

त्यांच्या मुख्य भाषणात, ब्रह्म कुमारींना 'परिवर्तनकारी शक्ती'म्हणून संबोधताना, समाजाला नकारात्मकतेपासून दूर नेत ध्यान, मानवी मूल्ये आणि आध्यात्मिक शिस्त यांच्या ताकदीने नैतिक स्पष्टता प्रदान करत असल्याचे म्हटले आहे.

सोनोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसमावेशक विकासाचे प्रारुप जे. सहानुभुती, चारित्र्य आणि उपेक्षितांच्या सक्षमीकरण यांनी प्रेरीत असून, ते ब्रह्मकुमारींनी स्वीकारलेल्या मूल्यांशी जुळत असल्याचे नमूद केले. 'सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास' ही केवळ घोषणा नसून ती एकता आणि उन्नती यांसाठीची आध्यात्मिक वचनबद्धता असल्याचे सोनोवाल यांनी नमूद केले.

'त्याग, संयम आणि नैतिक ताकद हे शक्तिशाली राष्ट्राचे आधारस्तंभ आहेत,'असेही ते पुढे म्हणाले.

त्याग आणि शिस्त या जुन्या कल्पना नाहीत तर खऱ्या देशप्रेमाचा आणि राष्ट्राभिमानाचा पाया रचणारे सद्गुण आहेत.

आजच्या जलद तांत्रिक आणि सामाजिक बदलांमध्ये तरुणांना मार्गदर्शन करण्याची गरज व्यक्त करताना, सोनोवाल म्हणाले, "संयमाची परीक्षा घेतली जाते आणि मूल्यांना सातत्याने आव्हान दिले जाते, त्या आजच्या जगात ज्याच्याकडे सहनशक्ती आहे - धैर्याची ताकद- ती आपली महाशक्ती आहे."

सर्वानंद सोनोवाल यांनी ब्रह्मकुमारींच्या राष्ट्रीय एकता आणि आध्यात्मिक मार्गदर्शन या विशेष कार्याचे कौतुक केले.

***

N.Chitale/VSS/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2140667) आगंतुक पटल : 6
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil