संरक्षण मंत्रालय
संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ केनिया आणि मादागास्करला भेट देणार
Posted On:
22 JUN 2025 11:02AM by PIB Mumbai
संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या नेतृत्वाखालील एक भारतीय शिष्टमंडळ 23 ते 26 जून 2025 दरम्यान केनिया आणि मादागास्करच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात, 23 जून रोजी सेठ केनियाच्या तैता-तावेटा काऊंटी येथे भारत व केनियाच्या शहीद जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात अलेल्या स्मारकाच्या संयुक्त अनावरण प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात, 26 जून रोजी अँटानानारिवो येथे मादागास्करच्या स्वातंत्र्याच्या 65 व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच सशस्त्र दलांच्या निर्मितीच्या निमित्ताने घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत.
भारत व केनिया यांचा समुद्र सीमारेषेने संपर्क आहे. परस्पर संबंधांमध्ये उच्चस्तरीय शिष्टमंडळांच्या भेटी, घनिष्ठ व्यापारी संबंध व गुंतवणूक, केनियातून वैद्यकीय उपचारांसाठी भारतात येणाऱ्या प्रवाशांची वाढ, तसेच व्यापक जनतेमधील परस्परसंबंध यांचा समावेश आहे. दोन्ही देशांना वसाहतवादाविरुद्धच्या लढ्यातील समान वारसा लाभलेला आहे. केनियाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक भारतीयांनी सक्रिय सहभाग घेतला होता.
भारत व मादागास्कर यांचे संबंध ऐतिहासिक जडणघडणीवर आधारित असून, या संबंधांना समान मूल्ये व प्रादेशिक स्थैर्य आणि विकासासाठी एकत्रित प्रयत्नांची जोड आहे. दोन्ही देशांमधील भागीदारी ही राजकीय, लष्करी, आर्थिक व राजकीय क्षेत्रात विस्तारलेली असून परस्पर विकास आणि सहकार्यासाठी सामायिक दृष्टिकोन अधोरेखित करते. केनियाच्या संरक्षण मंत्रालयाचे कॅबिनेट सचिव आणि मादागास्करच्या सशस्त्र दलांच्या मंत्र्यांच्या निमंत्रणानुसार संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळाचा दोन्ही आफ्रिकन राष्ट्रांचा हा दौरा होत आहे.
***
M.Jaybhaye/R.Dalekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2138658)