कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
एकीकृत पेन्शन योजनेचा (युपीएस) पर्याय निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार 'रिटायरमेंट ग्रॅच्युइटी आणि डेथ ग्रॅच्युइटी'चा लाभ
Posted On:
18 JUN 2025 10:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 जून 2025
वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने 24.01.2025 रोजीच्या त्यांच्या अधिसूचना क्रमांक FS-1/3/2023-PR द्वारे केंद्र सरकारच्या नागरी सेवेत भरती होणाऱ्यांसाठी एनपीएस अंतर्गत एक पर्याय म्हणून एकीकृत पेन्शन योजना 01.04.2025 पासून अधिसूचित केली होती. या योजनेअंतर्गत राष्ट्रीय पेन्शन सिस्टीम (एनपीएस) अंतर्गत येणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना एकीकृत पेन्शन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी एक वेळचा पर्याय देण्यात आला होता.
वरील बाबी लक्षात घेऊन निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने 18.06.2025 रोजी त्यांच्या ओएम क्रमांक 57/01/2025-P&PW(B)/UPS/10498 द्वारे स्पष्ट केले आहे की, एकीकृत पेन्शन योजनेचा पर्याय निवडणारे केंद्र सरकारी कर्मचारी केंद्रीय नागरी सेवा (राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत ग्रॅच्युइटी भरणा ) नियम, 2021 च्या तरतुदींनुसार 'रिटायरमेंट ग्रॅच्युइटी आणि डेथ ग्रॅच्युइटी'चा लाभ घेण्यास पात्र असतील.
S.Bedekar/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2137532)