इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मंत्रालये आणि विभागांमध्ये डिजिटल प्रशासन संप्रेषण मजबूत करण्यासाठी मायगोव्हकडून "थिंक सोशल @ मायगोव्ह" कार्यशाळेचे आयोजन

Posted On: 13 JUN 2025 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 जून 2025


इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या मायगोव्हने 12 जून 2025 रोजी इंडिया हॅबिटॅट सेंटर, नवी दिल्ली येथे "थिंक सोशल @ MyGov" ही एकदिवसीय कार्यशाळा यशस्वीरित्या आयोजित केली. या कार्यशाळेत मंत्रालये आणि विभागांमध्ये डिजिटल संप्रेषण मजबूत करणे आणि युट्यूब, मेटा आणि लिंक्ड इन सारख्या मंचांद्वारे नागरिकांचा सहभाग वाढवणे यावर लक्ष केंद्रित केले गेले. हा उपक्रम समावेशक संप्रेषणाद्वारे जनभागीदारी या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाला सहाय्य करतो.

कार्यक्रमाची सुरुवात एनईजीडीचे अध्यक्ष नंद कुमारम; आणि मायगोव्हचे संचालक शोभेंद्र बहादूर आणि मायगोव्हचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने झाली.

आपल्या भाषणात नंद कुमारम यांनी मायगोव्हच्या डिजिटल प्रवासावर भाष्य केले, नागरिक-केंद्रित प्रशासन चालविण्यासाठी या व्यासपीठाच्या वाढत्या प्रभावावर भर दिला. त्यांनी तरुणांशी संपर्क साधण्यात तसेच प्रशासन संवाद मजबूत करण्यात सोशल मीडियाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. सार्वजनिक सहभाग मोठ्या प्रमाणात वाढवणाऱ्या तसेच पारदर्शकतेला चालना देणाऱ्या प्रमुख मोहिमांवर त्यांनी प्रकाश टाकला. पंतप्रधानांच्या जनभागीदारीच्या दृष्टिकोनाशी सुसंगत अशा प्रभावी धोरण-निर्धारण आणि समावेशक सहभागाच्या दृष्टीने डिजिटल प्लॅटफॉर्मचा अधिक फायदा घेण्याचा मार्गही त्यांनी विशद केला.

शोभेंद्र बहादूर यांनी मायगोव्हच्या 11 वर्षांच्या प्रवासाचा तसेच प्रमुख सरकारी अभियाने  आणि नागरिकांच्या सहभागातील त्याच्या वाढत्या भूमिकेचा आढावा घेतला.

कार्यशाळेत मंत्रालये आणि विभागांमध्ये डिजिटल संप्रेषण वाढवणे तसेच युट्यूब आणि मेटा यासारख्या मंचांद्वारे नागरिकांचा सहभाग सुधारणे यावर भर देण्यात आला.

या कार्यशाळेत विविध मंत्रालये आणि विभागांमधील डिजिटल संप्रेषण व्यावसायिकांचा सहभाग होता. युट्यूब आणि मेटा यामधील विषयतज्ञांनी मायगोव्हच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहकार्याने ज्ञानसत्रे आयोजित केली, ज्यात धोरणात्मक सामग्री विकास, मंच बुद्धिमत्ता आणि प्रेक्षकांच्या सहभागाच्या पद्धतींवर लक्ष केंद्रित केले गेले.

या कार्यशाळेत सोशल मीडियाच्या खालील पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला:

· दृश्यमानता, सहभाग आणि पोहोच सुधारणे.

· गुगल ट्रेंड्स सारख्या विश्लेषण साधनांचा वापर.

· रील्स आणि स्टोरीज सारखे व्हिज्युअल कंटेंट फॉरमॅट.

· प्रेक्षकांचे वर्तन आणि लक्ष्यित कंटेंट समजून घेणे.

· व्हॉट्सॲप एपीआय, थ्रेड्स आणि मेटा एआय वर चर्चा.

याशिवाय, अनेक डोमेन तज्ञांनी सरकारची प्रमुख धोरणे, कार्यक्रम आणि योजनांच्या विस्तारासाठी सोशल मीडियाच्या वापराबद्दलचे आपले ज्ञान सामायिक केले:

कार्यशाळेदरम्यान अनेक मोहिमा आणि धोरणात्मक केस स्टडीज देखील अधोरेखित करण्यात आल्या.

· परीक्षा पे चर्चा 2025 – 3 कोटींहून अधिक सहभागींसह अभूतपूर्व नागरिक सहभाग साध्य केला, सहभागी प्रशासनाला दृढता मिळवून दिली.

· राष्ट्रीय निर्माता पुरस्कार, चांद्रयान 3 महा क्विझ,

· कॅम्पस अ‍ॅम्बेसेडर कार्यक्रम,

· जीडीपी पॉडकास्ट आणि निसर्गासाठी गर्जना 

· कोविड-19 दरम्यान मायगोव्ह‌ व्हाॅट्स ॲप सेवा – लसीकरण प्रमाणपत्रे आणि सत्यापित अद्यतने मिळविण्यासाठी नागरिकांना सक्षमपणे अखंड पोहोच उपलब्ध करून दिली. 

· ऑपरेशन सिंदूर – चुकीच्या माहिती फेटाळून लावून सत्यापित सरकारी माहितीचा रिअल-टाइम प्रसार सक्षम करण्यासाठी केस स्टडी.

· मायगोव्ह स्ट्रीम – नागरिक-केंद्रित, प्रशासन-संबंधित सामग्री संग्रहित करण्यासाठी समर्पित ओटीटी प्लॅटफॉर्मचा आरंभ.

N.Chitale/N.Mathure/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2136286)
Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu