कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसाठी मे 2025 चा केंद्रीकृत सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणाली वरील 34 वा अहवाल केला प्रकाशित

Posted On: 13 JUN 2025 8:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 जून 2025

प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने (डीएआरपीजी ) राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसाठी मे 2025 चा केंद्रीकृत सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणाली (CPGRAMS) वरील 34 वा मासिक अहवाल प्रकाशित केला. या अहवालात सार्वजनिक तक्रारींचे प्रकार आणि श्रेणी तसेच  राज्ये/केंद्रशासित प्रदेशांद्वारे त्यांच्या निराकरणाचे स्वरूप यांचे सविस्तर  विश्लेषण दिले आहे.

मे 2025 मध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी एकूण 78,123 तक्रारींचे निराकरण केले. मे 2025 मध्ये राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये सीपीजीआरएएमएस  पोर्टलवर 1,97,787 तक्रारी प्रलंबित आहेत. फीडबॅक कॉल सेंटरने मे 2025 मध्ये एकूण 65,601 प्रतिसाद संकलित  केले, तर  राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडून 26,633 प्रतिसाद संकलित  केले.

या अहवालात मे  2025 मध्ये CPGRAMS पोर्टलद्वारे CPGRAMS वर नोंदणीकृत नवीन वापरकर्त्यांचा डेटा उपलब्ध करून दिला आहे. मे 2025 मध्ये एकूण 60,499 नवीन वापरकर्त्यांनी नोंदणी केली, ज्यामध्ये उत्तर प्रदेशातून सर्वाधिक (10,043  नोंदणी) नोंदणी झाली .

या  अहवालात मे 2025 मध्ये सामान्य सेवा केंद्राद्वारे (सीएससी ) नोंदणीकृत तक्रारींचे राज्यनिहाय विश्लेषण देखील दिले आहे. CPGRAMS हे कॉमन सर्व्हिस सेंटर ( सीएससी ) पोर्टलशी एकीकृत केले आहे आणि 2.5 लाख ग्रामस्तरीय उद्योजकांशी जोडलेले असून 5 लाखांहून अधिक सीएससीवर उपलब्ध आहे. मे 2025 मध्ये सीएससीद्वारे 5,653  तक्रारी नोंदवल्या गेल्या होत्या. सीएससी च्या माध्यमातून ज्यासाठी सर्वाधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या त्या प्रमुख समस्या/श्रेणी  देखील यात अधोरेखित केल्या आहेत.

मे 2025 मध्ये उत्तर प्रदेश आणि गुजरातने सर्वाधिक तक्रारींचे निवारण केले, ज्यांची संख्या अनुक्रमे  26,658 आणि 14,369 होती. 1 ते  31 मे 2025 दरम्यान 14 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी  1000 हून अधिक तक्रारींचे निवारण केले आहे.

या अहवालात आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये सेवोत्तम योजनेअंतर्गत जारी केलेल्या अनुदानाची स्थिती देखील समाविष्ट आहे. मागील चार आर्थिक वर्षांमध्ये (2022-23, 2023-24, 2024-25, 2025-26), 855 प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण झाले आहेत, ज्यामध्ये सुमारे 28,438 अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

मे 2025 महिन्यातील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:

S No.

Financial Year

Training Conducted

Officers Trained

1

2022-23

280

8,496

2

2023-24

236

8,477

3

2024-25

306

10,257

4

2025-26

33

1,208

TOTAL

855

28,438

1. CPGRAMS वरील सार्वजनिक तक्रारींची स्थिती:

 · मे 2025 मध्ये, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी 78,123 सार्वजनिक तक्रारींचे निवारण केले. 

· राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये मासिक सार्वजनिक तक्रारी निपटारा  प्रमाण एप्रिल 2025च्या अखेरीस 57,021 होते ते वाढून मे 2025 च्या अखेरीस 78,123 वर पोहोचले.

2.  CPGRAMS वरील प्रलंबित सार्वजनिक तक्रारींची स्थिती

· 31 मे , 2025 पर्यंत 23 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 1000 हून अधिक प्रलंबित तक्रारी आहेत.

· 31 मे 2025 पर्यंत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 1,97,787 सार्वजनिक तक्रारी प्रलंबित आहेत.

अहवालाची लिंक: https://darpg.gov.in/sites/default/files/2025-05-01_state.pdf

 

N.Chitale/S.Kane/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2136267)
Read this release in: English , Urdu , Hindi