विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्रात नागपूर येथील मेसर्स नितिका फार्मास्युटिकल स्पेशालिटीज प्रायव्हेट लिमिटेड द्वारे जटिल औषध उत्पादनसंबंधी सहायक घटकांच्या स्वदेशी उत्पादनात टीडीबी करते सहाय्य

Posted On: 02 JUN 2025 5:28PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 जून 2025

 

भारताच्या औषध निर्मिती परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या  विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या  तंत्रज्ञान विकास मंडळाने (टीडीबी)  नागपूर स्थित मेसर्स नितिका फार्मास्युटिकल स्पेशालिटीज प्रायव्हेट लिमिटेडला  "मॅन्युफॅक्चर ऑफ कॉम्प्लेक्स एक्सिपियंट्स" या त्यांच्या प्रकल्पासाठी आर्थिक सहाय्य पुरवले आहे.

एक्सीपिएंट हे औषधनिर्माणशास्त्रीयदृष्ट्या निष्क्रिय असले तरी, औषधांची कार्यक्षमता, स्थिरता आणि वितरणासाठी महत्त्वाचे आहेत.  औषध निर्मिती अधिकाधिक अत्याधुनिक होत असून जटिल जेनेरिक, बायोफार्मास्युटिकल्स आणि नवीन वितरण प्रणालींच्या उदयाबरोबरच  उच्च-गुणवत्तेच्या, खास बनवलेल्या एक्सिपियंट्सची जागतिक स्तरावर मागणी वाढली आहे. भारत औषध निर्मितीचे एक महाकेंद्र असूनही, या जटिल  एक्सिपियंट्सचा मोठा हिस्सा अमेरिका , चीन आणि फ्रान्स सारख्या देशांमधून आयात करत आहे.

या प्रकल्पाच्या माध्यमातून  प्रगत औषध अनुप्रयोगांना पूरक असलेल्या 14 कॉम्प्लेक्स एक्सिपियंट्सचे व्यावसायिक स्तरावर उत्पादन घेण्यासाठी एक अत्याधुनिक उत्पादन सुविधा स्थापन करणे  हे मेसर्स नीतिका फार्मास्युटिकल स्पेशालिटीजचे उद्दिष्ट आहे. ही उत्पादने गुणवत्ता अनुरूप रचना  (QbD) निकषानुसार विकसित केली जातील, ज्यामुळे पृष्ठभागाचे क्षेत्र, कण आकार आणि आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तता करण्यासाठी स्थैर्य  यासारख्या मापदंडांमध्ये  अचूकता सुनिश्चित होईल.

1991 मध्ये स्थापन झालेली आणि नंतर 2011 मध्ये खाजगी कंपनी बनलेली नितिका फार्मास्युटिकल ही उत्तम रसायने आणि विशेष सहायक घटकांची एक विश्वासार्ह जागतिक पुरवठादार म्हणून विकसित झाली आहे. डीएसआयआर द्वारे मान्यताप्राप्त इन-हाऊस संशोधन आणि विकास  सुविधा आणि 90 देशांमध्ये जागतिक अस्तित्वासह ही  कंपनी या प्रकल्पाला  औषध सहाय्यक उत्पादनात स्वयंपूर्ण बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण झेप घेण्यासाठी उत्तम  स्थितीत आहे.

हा प्रकल्प केंद्र  सरकारच्या औषधनिर्माण उद्योगासाठीच्या उत्पादन संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजनेला देखील अनुरूप आहे, ज्या अंतर्गत मेसर्स नीतीकाची गट क - एमएसएमई (औषधनिर्माण) अंतर्गत लाभार्थी म्हणून निवड करण्यात आली आहे.

या प्रसंगी बोलताना, टीडीबीचे सचिव  राजेश कुमार पाठक म्हणाले: “भारताचे औषधनिर्मितीतील सामर्थ्य एक्सिपियंट्ससारख्या महत्त्वाच्या उत्पादनात देशांतर्गत लवचिकतेशी मेळ राखणारे असायला हवे. 

टीडीबीद्वारे  या मदतीबद्दल बोलताना , मेसर्स नितिका फार्मास्युटिकल स्पेशालिटीज प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रमुखांनी  म्हटले आहे की, "टीडीबीकडून मिळालेले हे सहाय्य भारतात जागतिक दर्जाचे एक्सिपियंट सोल्यूशन्स तयार करण्याच्या आमच्या वचनबद्धतेला बळ देते.  प्रगत पायाभूत सुविधा आणि विज्ञान-केंद्रित दृष्टिकोनासह, आयात एक्सिपियंटवरील आपल्या देशाचे अवलंबित्व कमी करण्याचे आणि देशांतर्गत विकसित आणि उत्पादित केलेल्या औषध घटकांमध्ये जागतिक नेतृत्व म्हणून उदयास येण्याचे आमचे लक्ष्य आहे."

 

* * *

N.Chitale/S.Kane/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2133421)
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil