युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
तिरंगा रॅली: फिट इंडिया संडेज ऑन सायकल'च्या 25 व्या आवृत्तीने सशस्त्र दलांना वाहिली आदरांजली आणि साजरा केला जागतिक सायकल दिन
डॉ. मनसुख मांडविया यांनी दिल्लीत देशव्यापी रॅलीचे केले नेतृत्व, कार्बन क्रेडिट ट्रॅकरचा केला प्रारंभ, अभिनेत्री शर्वरी यांना युवा फिट इंडिया आयकॉन म्हणून केले सन्मानित
Posted On:
01 JUN 2025 3:07PM by PIB Mumbai
फिट इंडिया संडेज ऑन सायकल'च्या 25 वी आवृत्ती तिरंगा सायकलिंग रॅली म्हणून साजरी करण्यात आली होती. ही रॅली आज सकाळी देशभरात यशस्वीरित्या पार पडली. भारतीय सशस्त्र दलांना आदरांजली वाहण्याच्या उद्देशाने देशभक्ती, तंदुरुस्ती आणि पर्यावरण जागरूकतेचा एक शक्तिशाली संगम अधोरेखित करत देशभरात 5000 हून अधिक ठिकाणी 15,000 हून अधिक सायकलस्वार या रॅलीत सामील झाले होते.

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियममध्ये 1500 हून अधिक सायकलस्वारांच्या रॅलीचे नेतृत्व केले. त्यांच्यासोबत सचिव (क्रीडा) हरि रंजन राव, क्रीडा आयकॉन - ऑलिंपिक पदक विजेता योगेश्वर दत्त, क्रिकेटपटू सबा करीम, कुस्तीगीर सरिता मोर, बॉलिवुड अभिनेत्री शर्वरी आणि भारतीय सायकलिंग संघ या रॅलीत सहभागी झाले होते.

रविवार सकाळच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक म्हणजे जम्मू आणि काश्मीरच्या अनेक भागांमधून सायकलस्वारांचा उत्साही सहभाग. जम्मू, पूंछ, किश्तवाड, कुलगाम, बांदीपोरा, शोपियान, बारामुल्ला, बडगाम, सांबा आणि इतर अनेक भागातील सायकलस्वार रॅलीत सहभागी झाले होते. विविध खेलो इंडिया सेंटर्स (KICs), खेलो इंडिया स्टेट सेंटर्स ऑफ एक्सलन्स (KISCEs) आणि SAI प्रशिक्षण केंद्रे (STCs) यांच्या द्वारे या सायकल रॅली आयोजित केल्या गेल्या होत्या.

विशेष करुन अलिकडेच यशस्वीरित्या पार ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सशस्त्र दलांची दाखवलेल्या असामान्य शौर्याचे गहन महत्त्व डॉ. मांडवीय यांनी अधोरेखित केले आणि सशस्त्र दलांना आदरांजली वाहिली. "ही तिरंगा रॅली आपल्या जवानांना आणि त्यांच्या बलिदानाला सलाम आहे. तंदुरुस्ती आणि देशभक्ती हातात हात घालून चालतात," असे डॉ. मांडवीय म्हणाले.

या ऐतिहासिक आवृत्तीत दोन प्रमुख उपक्रमांचा प्रारंभ झाला - फिट इंडिया न्यूजलेटर आणि दुसरे म्हणजे फिट इंडिया मोबाईल ॲपवर कार्बन क्रेडिट फीचर, सायकलस्वार या फिचरमुळे आता नियमितपणे सायकल चालवून वाचवलेल्या कार्बन क्रेडिटचा मागोवा घेऊ शकतात. " हे ॲप एकदा डाउनलोड केल्यामुळे तुम्हाला फिट इंडिया चळवळीचा भाग बनवता येईल," असे डॉ. मांडविया म्हणाले. "तुमचा वेग - 7 ते 34 किमी प्रतितास - आणि तुमचे अंतर रेकॉर्ड केले जाईल तसेच तुमचे कार्बन क्रेडिट्सही त्यात जोडले जातील."
नव्याने प्रारंभ झालेले फिट इंडिया न्यूजलेटर मासिक डायजेस्ट म्हणून देखील काम करेल. या मासिकात प्रेरणादायी बातम्या तसेच विविध फिटनेस प्रभावदर्शकांकडून अपडेट्स आणि प्रशिक्षण टिप्स असतील.
भावी सुपरस्टार म्हणून ओळखले जाणाऱ्या तसेच मुंजा आणि महाराजा सारख्या चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या, अभिनेत्री शर्वरीला डॉ. मांडविया यांनी या कार्यक्रमात 'युवा फिट इंडिया आयकॉन' ही पदवी प्रदान केली. "ही चळवळ खूप मोठी आहे. फिट इंडिया आयकॉन असणे हा एक सन्मान आहे. सायकलिंग मला शाळेच्या उन्हाळी सुट्ट्यांची आठवण करून देते - सुट्ट्यात आम्ही सर्वजण सायकल भाड्याने घ्यायचो आणि बाहेर पडायचो," असे शर्वरी यावेळी म्हणाली, "ही सायकल रॅली माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण या रॅलीचे आयोजन आपल्या शूर सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी करण्यात आले आहे. या शूर सैनिकांमुळेच आपण आपल्या घरात शांतपणे झोपू शकतो. आज या तिरंगा रॅलीद्वारे सैनिकांच्या शौर्याला मानवंदना देणे, हा माझा मोठा सन्मान आहे."
फिट इंडिया संडेज ऑन सायकल'च्या 25 व्या ऐतिहासिक आवृत्तीला अभूतपूर्व यश मिळवून देण्यासाठी संपूर्ण भारतातून अनेक खेळाडू या तिरंगा सायकलिंग रॅलीत सहभागी झाले होते.
ऑलिंपियन आणि अर्जुन पुरस्कार विजेती दीपा कर्माकर यांनी एसएआय प्रशिक्षण केंद्र (एसटीसी) आगरतळा येथे रॅलीला हिरवा झेंडा दाखवला, तर एसएआय सोनीपतमध्ये दीपिका कुमारी (पद्मश्री पुरस्कार विजेती धनुर्धारी), पूर्णिमा महातो (पद्मश्री धनुर्धारी प्रशिक्षक), अर्जुन पुरस्कार विजेती सुमित अंतिल, पॅरालिम्पिक दुहेरी सुवर्णपदक विजेती आणि आशियाई खेळांच्या सुवर्णपदक विजेत्या ज्योती सुरेखा, ओजस देवतळे, अदिती गोपीचंद स्वामी, पॅरालिम्पियन सुंदर गुर्जर आणि पुष्पेंदर यांनी भाग घेतला. प्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू एस.के. उथप्पा हे देखील एसएआय बेंगळुरू येथील रॅलीत उपस्थित होते. दरम्यान, एसएआय रोहतकमध्ये अखिल भारतीय पोलिस दलाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

***
S.Patil/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2133163)