संरक्षण मंत्रालय
भारतीय लष्कराकडून कृत्रिम युद्ध परिस्थितीत अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाची चाचणी
Posted On:
31 MAY 2025 3:18PM by PIB Mumbai
भारतीय सैन्य सध्या पोखरण फील्ड फायरिंग रेंज, बबीना फील्ड फायरिंग रेंज, आणि जोशीमठ सह देशभरातील महत्त्वाच्या ठिकाणी आपल्या व्यापक क्षमता विकासाचे प्रदर्शन करते आहे. त्याचबरोबर आग्रा आणि गोपालपूर येथे समर्पित हवाई संरक्षण उपकरणांचे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले आहे. या क्षेत्र-आधारित चाचण्या युद्धासारख्या परिस्थितीत केल्या जात आहेत जिथे अत्याधुनिक संरक्षण प्रणालींच्या कामगिरीचे बारकाईने मूल्यांकन करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक सिम्युलेटेड युद्ध तंत्रांचा समावेश केला जात आहे. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी 27 मे 2025 रोजी बबिना फील्ड फायरिंग रेंजला भेट दिली, चालू कार्यक्रमांचा आढावा घेतला आणि सर्व भागधारकांशी संवाद साधला.
या उपक्रमांतर्गत स्वदेशी क्षमता विकासाला गती देण्याच्या उद्देशाने आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत विकसित केलेल्या प्रगत तंत्रज्ञानाची विस्तृत श्रेणी प्रदर्शित करण्यात आली. या चाचण्या भारतीय सैन्याच्या "परिवर्तनाच्या दशकाच्या" आराखड्यामधील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहेत, आणि संभाव्य युद्ध परिस्थितीच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा जलद समावेश सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने त्या घेतल्या जात आहेत. या संरक्षण प्रदर्शनात अनेक संरक्षण उद्योग भागीदार मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत, जे भारतीय सैन्य आणि स्थानिक उत्पादक यांच्यातील वाढत्या सहकार्याचे प्रतिबिंब आहे.
मूल्यांकन होणार असलेले मुख्य मंच :
- मानवरहित हवाई प्रणाली (युएएस)
- युएव्ही लॉन्च्ड प्रिसिजन गाईडेड म्युनिशन्स (यूएलपीजीएम)
- रनवे इंडिपेंडेंट (आरडब्ल्यूआय) रिमोटली पायलटेड एरियल सिस्टम (आरपीएएस)
- काउंटर-युएएस सोल्यूशन्स
- मानवरहित हवाई वाहन शस्त्रे
- विशिष्ट व्हर्टिकल लाँच (एसव्हीएल) ड्रोन
- प्रिसिजन मल्टी म्युनिशन डिलिव्हरी सिस्टम्स
- इंटिग्रेटेड ड्रोन डिटेक्शन अँड इंटरडिक्शन सिस्टम (IDDIS)
- निम्न स्तरीय कमी वजन असलेले रडार
- व्हीएसएचओआरएडीएस (पुढील पिढी) आयआर सिस्टम
- इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर (ईडब्ल्यू) प्लॅटफॉर्म्स
या मूल्यांकनांच्या माध्यमातून आपली तांत्रिक आघाडी बळकट करणे, परिचालनात्मक सज्जता वाढवणे आणि संरक्षण क्षमता विकासात देशी नवोन्मेष आणि आत्मनिर्भरतेप्रति आपल्या वचनबद्धतेची खातरजमा करणे, हे भारतीय सैन्याचे उद्दिष्ट आहे.
***
M.Pange/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2133018)