विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इलेक्ट्रिक हंसा (ई-हंसा),हे नव्या पिढीचे दोन आसनी इलेक्ट्रिक ट्रेनर विमान विकसित करण्याची प्रक्रिया भारताने केली सुरू - डॉ.जितेंद्र सिंह

Posted On: 27 MAY 2025 7:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 मे 2025

भारताने इलेक्ट्रिक हंसा (ई-हंसा), हे नव्या पिढीचे दोन आसनी इलेक्ट्रिक ट्रेनर विमान विकसित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आज नवी दिल्ली येथील विज्ञान केंद्रात सर्व प्रमुख विज्ञान विभागांच्या सचिवांसोबतच्या उच्चस्तरीय मासिक आढावा बैठकीच्या अध्यक्षपदावरून बोलताना केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली.

हे नवीन विमान वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) संस्थेच्या बेंगळुरू येथील "नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज"(एनएएल) संस्थेच्या वतीने  स्वदेशी पद्धतीने विकसित केले जात आहे ही अभिमानाची बाब आहे, असे  वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) उपाध्यक्ष डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.  

सीएसआयआर-एनएएल ने विकसित केलेल्या इलेक्ट्रिक हंसा (E-HANSA) या ट्रेनर विमानाची किंमत आयात  पर्यायांपेक्षा खूपच कमी असेल अशी अपेक्षा आहे. ही किंमत कदाचित सुमारे 2 कोटी रुपये असेल. ही किंमत आयात ट्रेनर विमानाच्या जवळपास निम्मी आहे.

ई-हंसा हा मोठ्या हंसा-3 (एनजी) प्रशिक्षण विमान कार्यक्रमाचा एक भाग आहे, जो भारतात वैमानिक प्रशिक्षणासाठी किफायतशीर आणि स्वदेशी पर्याय म्हणून तयार केला आहे.

भारताचे ई-हंसा विमान देशाच्या हरित विमान वाहतूक उद्दिष्टांच्या दिशेने तसेच विमान चालविण्यासाठी हरित किंवा स्वच्छ ऊर्जा इंधनाच्या वापराच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असेल, असे डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.


S.Kane/S.Mukhedkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2131733)
Read this release in: English , Urdu , Hindi