विशेष सेवा आणि लेख
पुदुचेरी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 च्या 25 दिवसांच्या उलटगणना कार्यक्रमाचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
27 MAY 2025 3:41PM by PIB Mumbai
चेन्नई, 27 मे 2025
आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 च्या 25 दिवसांच्या उलटगणना कार्यक्रमाचे उद्घाटन पुदुचेरी येथे 27 मे 2025 रोजी केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले. पुदुचेरीचे नायब राज्यपाल थिरु के.कैलाशनाथन आणि पुदुचेरीचे मुख्यमंत्री थिरु एन.रंगास्वामी हेदेखील यावेळी उपस्थित होते.

सांस्कृतिक वारशासाठी प्रसिद्ध, शांत किनारपट्टी असलेल्या पुदुचेरीमध्ये आरोग्यविषयक जागृतीची लाट पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 ला 25 दिवस उरले असताना या उलटगणती कार्यक्रमात 6,000 हून अधिक योग प्रेमी जमले होते. बीच रोडवरील गौबर्ट अव्हेन्यूवरील रमणीय गांधी थिदल येथे आयोजित या उत्साही योग महोत्सवाचे आयोजन आयुष मंत्रालयाच्या मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेद्वारे करण्यात आले होते. कॉमन योगा प्रोटोकॉल अर्थात सामान्य योग नियमावलीच्या सामूहिक प्रात्यक्षिकात उत्साह आणि सहभागाचे हे उल्लेखनीय प्रदर्शन वैयक्तिक आणि सामाजिक उन्नतीसाठी योगाचे वाढते महत्त्व अधोरेखित करते.

"महर्षी अरबिंदो यांचे कार्यस्थळ पुदुचेरी हे विविधतेमध्ये भारतीय संस्कृतीच्या शाश्वत मूल्यांचे जतन करणारे एक सचेत उदाहरण आहे" असे उपस्थितांना संबोधित करताना आयुष मंत्र्यांनी निदर्शनास आणले.
त्यांनी योगाची परिवर्तनकारी शक्ती आणि शारीरिक आणि मानसिक कल्याणाला चालना देण्यासाठी त्याची प्रासंगिकता अधोरेखित केली. ते म्हणाले, "योग हा केवळ एक व्यायाम नाही; तो निरोगी जीवनाची एक प्राचीन कला आहे जी तन आणि मनाला जोडते. योगाचा अवलंब करणाऱ्यांना शांती, शक्ती आणि स्पष्टता जाणवते." त्यांनी सांगितले की, "या वर्षी आपल्या पंतप्रधानांनी निवडलेली प्रेरणादायी संकल्पना, ‘एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग’ ही निरोगी वसुंधरा आणि निकोप मानवतेसाठी आपल्या सामूहिक आकांक्षेला परिपूर्णपणे प्रतिबिंबित करते.
योग ही सध्याच्या काळाची एक महत्त्वपूर्ण गरज आहे आणि आपल्या निरोगी भविष्याचा एक अविभाज्य भाग आहे हा संदेश पुद्दुचेरीच्या या ऐतिहासिक भूमीवरून आपल्याला द्यायचा आहे, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे नाशिकमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 च्या उलटगणनेचे 50 दिवस राहिलेले असताना सुरू करण्यात आलेल्या योग संगम पोर्टलवरच्या नोंदणी संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. या पोर्टलवर आतापर्यंत 12,000 हून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. ही संख्या संपूर्ण भारतात योगाप्रति जनतेच्या वाढत्या उत्साहाचे प्रतिक आहे.
योग संगम पोर्टलवर खालील लिंकद्वारे पोहोचता येईल: https://yoga.ayush.gov.in/yoga-sangam
या वर्षी, योग दिनाच्या कार्यक्रमाच्या 11 व्या वर्षाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम 10 विशेष कार्यक्रमाद्वारे साजरा केला जाणार आहे, जे त्याला सर्वात व्यापक आणि समावेशक बनवते:
योग संगम - 1,00,000 ठिकाणी समक्रमित योग प्रात्यक्षिके.
योग बंधन - जागतिक देवाणघेवाण कार्यक्रम आणि ज्ञान सत्रे.
योग पार्क - दीर्घकालीन सामुदायिक सहभागासाठी योग पार्कचा विकास.
योग समावेश - दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, मुले आणि उपेक्षित गटांसाठी विशेष योग कार्यक्रम.
योग प्रभाव - सार्वजनिक आरोग्यात योगाच्या भूमिकेवर गेल्या दशकात पडलेल्या प्रभावाचे मूल्यांकन .
योग कनेक्ट - ‘योग कनेक्ट’ ही एक जागतिक ऑनलाइन योग शिखर परिषद आहे जी जगभरातील योग तज्ञ, धोरणकर्ते आणि आरोग्य तज्ञांना एकत्र आणेल तसेच योग आणि निरामयतेच्या विकसित होत असलेल्या परिदृश्यावर विचारांच्या देवाणघेवाणीसाठी एक जागतिक व्यासपीठ प्रदान करेल.
हरित योग - वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहिमेसह योग कार्यक्रमाचे संयोजन करणारा एक शाश्वतताभिमुख उपक्रम.
योग अनप्लग्ड - तरुणांना योगाकडे आकर्षित करण्यासाठी कार्यक्रमांची विशेष मालिका.
योग महाकुंभ - देशभरातील 10 ठिकाणी एक आठवडा चालणारा योग महोत्सव आयोजित केला जाईल.
सामयोग - योगाच्या पुराव्यांचा समकालीन आणि आधुनिक चिकित्सा पद्धतीत अनुवाद
S.Tupe/V.Joshi/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2131617)
आगंतुक पटल : 12