सहकार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद- मान्यताप्राप्त दोन वर्षांचा पीजीडीएम अभ्यासक्रम केला सुरू

Posted On: 26 MAY 2025 6:48PM by PIB Mumbai

 

भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाने प्रोत्साहित केलेल्या तसेच राष्ट्रीय सहकारी प्रशिक्षण परिषदेअंतर्गत (NCCT) कार्यरत असणाऱ्या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था (VAMNICOM), या संस्थेने आज पुण्यात आपल्या नवीन अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची (AICTE) - मान्यता असलेल्या दोन वर्षांच्या PGDM अभ्यासक्रमाचे उद्घाटन केले.

या कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन केंद्रीय सहकार मंत्रालयाचे सचिव डॉ. आशिष कुमार भुतानी यांच्या हस्ते सहकार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव पंकज कुमार बन्सल यांच्या उपस्थितीत झाले. वॅमनिकॉम (VAMNICOM) आणि आंतरराष्ट्रीय कृषी बँकिंग मध्ये सहकार्य आणि प्रशिक्षण केंद्राचे (CICTAB) संचालक डॉ. सुवा कांता मोहंती यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. सुवा कांता मोहंती यांनी विशेष आणि भविष्यासाठी सज्ज व्यवस्थापकीय शिक्षणाद्वारे सहकारी क्षेत्राला सक्षम बनविण्यात नवीन PGDM अभ्यासक्रमाचे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमाला प्राध्यापक, अधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. या सर्वांची उपस्थिती भारतातील सहकारी शिक्षण बळकट करण्यासाठी उत्साह आणि वचनबद्धता दर्शवणारी आहे.

सहकार विषयात विशेष असलेल्या या अभ्यासक्रमाच्या प्रारंभामुळे सहकार चळवळीसाठी व्यावसायिक प्रशिक्षण घेतलेल्या नेतृत्व वर्गाची निर्मिती करण्याच्या मंत्रालयाच्या प्रयत्नांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा सर झाला आहे. विद्यार्थ्यांना सहकारी संस्था आणि क्षेत्रात नवोन्मेष आणि शाश्वतता साधण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान, कौशल्ये आणि नैतिक मूल्ये प्रदान करणे हे या अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट आहे.

***

S.Patil/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2131487) अभ्यागत कक्ष : 13
Read this releasein: English