रेल्वे मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 22 मे 2025 रोजी महाराष्ट्रातील 15 रेल्वे स्थानकांसह 103 अमृत स्थानकांचे उद्घाटन करणार
Posted On:
21 MAY 2025 2:56PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली रेल्वे मंत्रालयाने डिसेंबर 2022 मध्ये अमृत भारत स्थानक योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत, देशभरातील 1309 स्थानकांचे आधुनिकीकरण करून त्यांना आधुनिक, एकात्मिक वाहतूक केंद्रांमध्ये रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले गेले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा 6 ऑगस्ट 2023 मध्ये आणि नंतर 26 फेब्रुवारी 2024 रोजी अशा दोन टप्प्यांमध्ये या स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली होती. या योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकांना दीर्घकालीन विकास, बहुआयामी एकात्मिकीकरण, दिव्यांगजनांसाठी वाढीव सुविधा, शाश्वततेमध्ये सुधारणा आणि शहरी केंद्र म्हणून भविष्याच्या दृष्टीने सज्ज असलेल्या रेल्वे स्थानकामध्ये परावर्तीत करण्यावर भर दिला गेला आहे.
आता या योजनेअंतर्गतचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून, उद्या म्हणजेच 22 मे 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय रेल्वेच्या 103 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचे उद्घाटन करणार आहे. यात महाराष्ट्रातील 15 प्रमुख रेल्वे स्थानकांचाही समावेश आहे. ही स्थानके अत्याधुनिक प्रवासी अनुकूल सुविधांनी अद्ययावत करण्यात आली, या सगळ्यासाठी एकत्रितपणे 175 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च केला गेला आहे.
महाराष्ट्रातील या 15 रेल्वे स्थानकांमध्ये परळ, चिंचपोकळी, वडाळा रोड, माटुंगा, शहाड, लोणंद, केडगाव, लासलगाव, मूर्तिजापूर जंक्शन, देवळाली, धुळे, सावदा, चंदा फोर्ट, एनएससीबी इटवारी जंक्शन, आमगाव या स्थानकांचा समावेश आहे.
पुनर्विकसित रेल्वे स्थानकांसंबंधीचा तपशील खाली दिला आहे :
1. चिंचपोकळी -
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील या चिंचपोकळी स्थानकातील प्रवासी सुविधांचे अद्ययावतीकरण केले गेले आहे. .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 फेब्रुवारी 2024 रोजी चिंचपोकळी स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामाची पायाभरणी केली होती.
प्रवाशांसाठी अधिक आरामदायी आणि सुलभतापूर्णतेच्या अनुषंगाने, चिंचपोकळी रेल्वे स्थानकात अनेक महत्त्वाच्या सुधारणा केल्या गेल्या आहेत.
या प्रकल्पासाठी 11.81 कोटी रुपये इतका खर्च आला आहे.
- तिकीट आरक्षण कार्यालयाचे सौंदर्यीकरण : कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या दोन्ही दिशांकडच्या तिकीट आरक्षण कार्यालयांचे स्वच्छता, अधिक प्रकाशमानतेच्या अनुषंगाने अंतर्गत भागात नूतनीकरण केले गेले आहे.
- शौचालयांच्या वापर आणि प्रवेश सुलभतेत सुधारणा : सार्वजनिक शौचालयांच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांवर शाहपट नक्षीच्या फरशा बसवून ते सपाट केले आहेत, ज्यामुळे तिथपर्यंत ये - जा करणे सुलभ झाले आहे.
- पिण्याच्या पाण्याची अतिरिक्त सोय : पाण्याची चांगली उपलब्धता असावी यासाठी तीन बूथवर (3 x 2) एकूण सहा नवीन नळ बसवण्यात आले आहेत.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेकडील पादचारी पुलाचे सौंदर्यीकरण : पादचारी पूलावर सौंदर्यदृष्टीने आणि प्रकाशयोजनेच्या अनुषंगाने सुधारणा करून ते अद्ययावत केले गेले आहेत.
- वाहन उद्यान (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेकडील पूर्वेकडची बाजू) : हे एक संकल्पनाधारीत उद्यान असून, या उद्यानामुळे स्थानक परिसराला हिरवळीचे क्षेत्र असलेल्या एका आनंददायी प्रतीक्षा क्षेत्राची जोड लाभली आहे.
- नवीन आसनव्यवस्था : प्रवाशांच्या सोयीसाठी 2x6, 6x8, 7x10 आणि 2x12 आकाराची अनेक नवीन बाके बसवण्यात आली आहेत.
- सुस्पष्ट दिशादर्शक : उत्तम मार्गदर्शनपर तसेच दिशादर्शक सुविधेच्या अनुषंगाने नवीन दिशादर्शक फलक बसवण्यात आले आहेत.
- नूतनीकृत शौचालये : नवीन मूत्रालये, भारतीय पद्धतीची शौच कुपे आणि स्वच्छतेच्या पातळीवर सुधारणा करून शौचालयांचे अद्ययावितीकरण केले गेले आहे.
- दिव्यांगजन तिकीट आरक्षण खिडकी : दिव्यांग प्रवाशांसाठी एक तिकीट आरक्षण खिडकी सुरू करण्यात आली आहे.




2. परळ -
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील परळ या रेल्वे स्थानकात प्रवासी सुविधांचा विस्तार केला गेला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 06 ऑगस्ट 2023 रोजी परळ रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामाची पायाभरणी केली होती.
या प्रकल्पासाठी 19.41 कोटी रुपये इतका खर्च आला आहे.
परळ स्थानकात प्रवाशांची सोय, सुलभता आणि एकूण अनुभवाच्या समृद्धतेत वाढ करण्याच्या अनुषंगाने अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत :
- नवीन तिकीट आरक्षण कार्यालय : दिव्यांगस्नेही वैशिष्ट्ये आणि मोबाइल चार्जिंग सुविधेने सुसज्ज.
- सशुल्क पार्किंग सुविधा : प्रवाशांकरता सुरक्षित आणि सोयीस्कर पार्किंग सुविधेची सुनिश्चिती करण्याकरता ही सेवा सुरू केली गेली आहे.
- प्रवाशांच्या वावराच्या परिसराचे अद्ययावतीकीकरण : प्रवाशांचा वावर सुलभ करण्यासाठी आणि एकूण स्थानकाचे सौंदर्य वाढवण्याच्या अनुषंगाने विकास आणि सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण केले गेले आहे.
- सुधारित दिशादर्शक : उत्तम दिशा - मार्गदर्शनासाठी सुस्पष्ट, द्विभाषिक दिशादर्शक फलक बसवण्यात आले आहेत.
- सशुल्क शौचालये : यात दिव्यांगजनांसाठी स्वतंत्र सुविधांचा समावेश आहे, यामुळे स्वच्छता आणि वापर सुलभतेची सुनिश्चिती झाली आहे.
- पिण्याच्या पाण्यासाठीचे नळ : पिण्याचे स्वच्छ पाणी सहज उपलब्ध होईल याची सुनिश्चित करण्यासाठी प्रमुख ठिकाणी नळ बसवण्यात आले आहेत.
- बहुपयोगी कक्ष : विविध प्रवासी - केंद्रित क्रिया प्रक्रियांसाठी एका बहुपयोगी जागेची रचना केली गेली आहे.
- व्हर्टिकल गार्डन्स : स्थानक परिसराला हिरवळीची जोड दिल्यामुळे स्थानकाच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे, तसेच यामुळे स्वच्छ पर्यावरणाला प्रोत्साहन मिळाले आहे.
- चांगली प्रकाशमानता आणि वायुवीजन : भरपूर प्रकाश असावा तसेच वातावरण अधिक आरामदायी असावे यासाठी नवीन पंखे आणि ट्यूबलाइट्स बसवण्यात आले आहेत.




3. वडाळा रोड रेल्वे स्थानक -
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील वडाळा रोड रेल्वे स्थानकात प्रवासी सुविधांचे अद्ययावितीकरण केले गेले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी वडाळा रोड स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पाचा कोनशीला समारंभ झाला.
प्रकल्पाचा एकूण खर्च: 23.02 कोटी रुपये
प्रवाशांची सोय, सुरक्षितता यात भर घालण्यासाठी तसेच स्थानकाच्या सुशोभीकरणासाठी वडाळा रोड स्थानकाचे व्यापक प्रमाणात अद्ययावतीकरण करण्यात आले आहे:
- नुतनीकरण झालेली बुकिंग कार्यालये: प्रवाशांच्या अधिक उत्तम सेवेसाठी पादचारी पुलाच्या स्तरावरील तसेच फलाट क्र. 1 वरील बुकिंग कार्यालयांचे नुतनीकरण.
- अद्ययावत शौचालये: फलाट क्र. 1 वर (कुर्ल्याच्या दिशेकडील टोकाला) असलेल्या तसेच फलाट क्र. 4 वर (कुर्ल्याच्या दिशेकडील टोकाला) सशुल्क वापराच्या शौचालयांचे नुतनीकरण.
- फॉल्स सिलिंग्ज: सौंदर्यीकरणात अधिक भर घालण्यासाठी फलाट क्र.1 वर तसेच फलाट क्र, 1 वर असलेल्या बुकिंग कार्यालयाच्या अंतर्भागात.
- पाण्याचे नवीन बूथ: पिण्याचे पाणी सुलभतेने उपलब्ध होण्याच्या दृष्टीने फलाट क्र.1(छशिमट च्या दिशेकडील टोकाला) आणि फलाट क्र. 4 वर (कुर्ल्याच्या दिशेकडील टोकाला)
- प्रवेशद्वाराचे नूतनीकरण: फलाट क्र.1 वरील बुकिंग कार्यालयाजवळ तसेच मध्यात असलेल्या पादचारी पुलावरील, प्रवाशांना सुलभतेने स्थानकात प्रवेश करता यावा यासाठी.
- भिंतींवरील बागकाम: खालील जागांसह अनेक ठिकाणी भिंतींच्या आधाराने बागांची लागवड करण्यात आली आहे
- फलाट क्र.1(सार्वजनिक शौचालय ते कुर्ल्याच्या बाजूकडील टोक)
- मध्यात असलेल्या पादचारी पुलावरील प्रवेशद्वाराजवळ
- फलाट क्र. 4 (छशिमटच्या दिशेकडील टोक)
- पादचारी पुलाचे नूतनीकरण (छशिमटच्या दिशेकडील टोक): पादचारी पुलाची रचना तसेच दृश्यमान आकर्षकतेत भर.
- आसन व्यवस्था :
- फलाटांवर संगमरवरी विस्तार
- खांबांच्या सभोवताली स्टीलच्या पाईप्सची आसने
- फलाट क्र.4 च्या भिंतींचे नूतनीकरण: फलाट क्र.4 ला लागून असलेली भिंत नव्याने सुशोभित करण्यात आली.
- पॅनिक बटणे: महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी फलाट क्र.1 तसेच फलाट क्र.4 वर महिला डब्यांच्या ठिकाणी बसवण्यात आली.
- तांत्रिक अद्ययावतीकरणे:
- नवीन सीसीटीव्ही कॅमेरे
- गाड्यांची माहिती देणारे अत्याधुनिक सूचनाफलक
- वाढीव प्रकाशयोजना
- सुस्पष्ट चिन्हावली: स्टीलच्या खांबांवर आणि प्रवेशद्वाराजवळ चिन्हांचे नवे बोर्ड्स आणि स्थानकाच्या नावाचे बोर्ड बसवण्यात आले.
- स्थानकाच्या नावाचे सौंदर्यीकरण : बुकिंग कार्यालयाजवळची प्रवेशद्वारे तसेच मध्यभागी असलेला पादचारी पूल
- सुलभतेने स्थानकात पोहोचण्यासाठी उतरंड: दिव्यांगांना सुलभतेने वावरता यावे म्हणून फलाट क्र. 4 वर 2 तसेच बुकिंग कार्यालयाजवळ 1 उतरंड उभारली.
- प्रथम-श्रेणीचे सीमांकन : फलाट क्र. 1,2,3 आणि 4 वर सुस्पष्ट दिसतील अश्या जमिनीवरील वेगळ्या लाद्या.
- पादचारी पुलांवर लोखंडाच्या जाळ्या : प्रवाशांच्या अतिरिक्त सुरक्षिततेसाठी
- छतावरील जीआय शीट बदलणे: अधिक टिकाऊपणा तसेच नेत्रसुखदतेसाठी
- पाण्याच्या पुनर्वापरासाठीचे संयंत्र: शाश्वततेला चालना देण्यासाठी फलाट क्र.1 वरील सार्वजनिक शौचालयाजवळ उभारण्यात आले.
- कार्यालयांमध्ये नवीन फर्निचर: सुधारित प्रशासकीय पाठबळासाठी अधिक उत्तम कार्यस्थळ
UMOK.JPG)


4. माटुंगा स्थानक
माटुंगा स्थानकात प्रवाशांसाठी सुधारित सोयीसुविधा – मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील भारतातील पहिले संपूर्णपणे महिलांद्वारे संचालित रेल्वे स्थानक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी माटुंगा स्थानकाच्या पुनर्विकास कार्याची कोनशीला ठेवली.
प्रकल्पाचा एकूण खर्च 17.28 कोटी रुपये
खालील नव्या प्रवासी-स्नेही अद्ययावत सुविधांसह माटुंगा रेल्वे स्थानकाने नवे उदाहरण घालून दिले आहे:
- स्थानकाचे सौंदर्यीकरण: स्थानकाच्या संपूर्ण परिसराला आता सुशोभीकरण सुधारणा तसेच स्वच्छ आसमंतासह ताजेपणाचा स्पर्श
- नवीन सरकते जिने : प्रवाशांच्या सुलभ आणि सुरक्षित आवागमनासाठी फलाट क्र. 1 आणि 2 वर बसवले.
- हरित भिंत आणि सेल्फी पॉईंट: पर्यावरण-स्नेही भिंतीवरील बाग आणि सेल्फी काढण्याच्या जागेने येथील भागाला मोहकता आणि आकर्षकता मिळवून दिली.
- हिरवीगार वनराई: संपूर्ण स्थानकातील हिरवीगार झाडे प्रवाशांना सुखदायक वातावरण देतात.
- सुधारित छत : चांगल्या आच्छादनासाठी पादचारी पुलावर तसेच सरकत्या जिन्यांवर उन्नत आणि आधुनिक छत व्यवस्था
- स्थानकांच्या उंचीत वाढ : गाडीत चढणे अधिक सोपे आणि सुरक्षित होण्यासाठी फलाट क्र.3 आणि 4 ची उंची वाढवली.
- फलाट क्र. 1 वर लाद्या बसवणे आणि मार्गदर्शक सूचना: नव्या लाद्या बसवलेले आणि स्पष्ट शब्दांत दिशादर्शक चिन्हे असलेले फलाट
- अद्ययावत शौचालये: अत्याधुनिक सोयी तसेच दिव्यांग-स्नेही सुविधा असलेले उन्नत शौचालय कूप
- पाणी मिळण्याची नवीन केंद्रे : पिण्याचे पाणी सुलभतेने उपलब्ध व्हावे म्हणून फलाट क्र. 1 आणि 2 च्या दोन्ही टोकांना बसवली.
- फलाट क्र. 1 आणि 2 च्या माथ्यावर छत: सर्व प्रकारच्या हंगामांमध्ये प्रवाशांना अधिक आराम मिळण्यासाठी नवा निवारा.
- एसएम कार्यालयाचे नूतनीकरण: अधिक उत्तम प्रशासनासाठी स्टेशन मास्तरांच्या कार्यालयाचे आधुनिकीकरण.
- कार्यालयात नवे फर्निचर : कर्मचाऱ्यांना अधिक कार्यक्षमतेसह काम करता यावे म्हणून अद्ययावत कार्यस्थाने.


5. शहाड स्थानक -
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील शहाड स्थानकावर प्रवासीस्नेही नूतनीकरण
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26.02.2024 रोजी शहाड स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली.
याचा एकूण प्रकल्प खर्च 8.39 कोटी रुपये आहे.
शहाड स्थानक अधिक आरामदायी, सुशोभित आणि सुविधाजनक करण्यासाठी अनेक नवीन वैशिष्ट्यांसह अद्ययावत करण्यात आले आहे:
- आकर्षक प्रवेशद्वार: फलाट क्रमांक 1 आणि 2 वरील नव्याने रचना केलेली प्रवेशद्वारे स्वागतसज्ज दिसतात.
- वृक्षारोपण: तिकीट काउंटरच्या समोर विकसित केलेली सुंदर हिरवळ, स्थानकाची शोभा वाढवते.
- प्रकाशयोजनेसह भिंतीवरील बाग: फलाट 1 ची भिंत आकर्षक दिसण्यासाठी त्यावर प्रकाशयोजनेसह बाग फुलवण्यात आली आहे.
- आधुनिक तिकीट काउंटर: प्रवाशांच्या सुलभतेसाठी अद्ययावत सुविधांसह नूतनीकरण करण्यात आले आहे.
- पूर्णपणे काँक्रीट केलेले पार्किंग क्षेत्र: तीन विकसित पार्किंग क्षेत्रात वाहनांसाठी सहज आणि स्वच्छ प्रवेश सुविधा
- फलाटावरील एलईडी दिवे आणि पंखे: फलाट क्रमांक 1 आणि 2 आता प्रवाशांच्या सोयीसाठी चांगले प्रकाशित आणि हवेशीर करण्यात आले आहेत.
- डिलक्स शौचालये: स्वच्छता आणि सुलभतेची सुनिश्चिती करत आधुनिक सुविधांनी सुसज्ज.
- स्वच्छ आणि पर्यावरणपूरक वातावरण: हिरवेगार, नीटनेटके आणि प्रवाशांना अनुकूल वातावरण राखण्यावर भर


6. लासलगाव -
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील लासलगाव स्थानकावर अद्ययावत प्रवासी सुविधा
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26.02.2024 रोजी लासलगाव स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली.
याचा एकूण प्रकल्प खर्च 30.14 कोटी रुपये आहे.
प्रवाशांची सोय आणि स्थानकाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी लासलगाव स्थानकाचा व्यापक विकास करण्यात आला आहे:
- नवीन बुकिंग आणि पीआरएस इमारत: तिकीट आणि आरक्षण सेवा दोन्हीसाठी आधुनिक रचना.
- फलाटाचे नूतनीकरण: स्वच्छ आणि सुरक्षित दिसण्यासाठी टिकाऊ कोटा दगडी फरशांसह पृष्ठभागाचे नूतनीकरण.
- वॉटर स्टँड: स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुधारित उपलब्धता.
- फलाटावरील शेड, पंखे आणि दिवे: सर्व फलाटांवर चांगला निवारा आणि प्रकाशयोजनेसह सुखसोयीत वाढ
- एनटीईएससह घोषणा प्रणाली: प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेचे अद्ययावत वेळापत्रक
- नवीन प्रथम श्रेणीतील प्रतीक्षा कक्ष: प्रीमियम प्रवाशांसाठी आरामदायी आणि अद्ययावत केलेला प्रतीक्षा कक्ष
- कोच निर्देशक प्रणाली: डब्यांची जागा कळण्यासाठी एलईडी-आधारित निर्देशक.
- आयव्हीडी (इंटिग्रेटेड व्हिडिओ डिस्प्ले प्रणाली): रेल्वेगाड्यांशी संबंधित माहितीचे अखंड डिजिटल प्रदर्शन.
- नवीन व्हीआयपी कक्ष आणि एसएम कार्यालय: कार्यक्षम परिचालनासाठी नूतनीकरण केलेले प्रशासकीय क्षेत्र.
- अद्ययावत बैठक व्यवस्था:
- 30 स्टेनलेस स्टील बाक
- ग्रॅनाइट-प्रकारचे बाक विकसित केली जात आहेत.
- प्रस्तावित विश्राम कक्ष: नवीन इमारतीत प्रवाशांच्या विश्रांतीसाठी नियोजित सुविधा.
- सर्क्युलेटिंग एरिया डेव्हलपमेंट:
- डांबरीकरणासह जीएसआय
- काँक्रीट पेव्हिंगसह जीएसआयआय
- सुधारित रस्ते कनेक्टिव्हिटी: दोन्हीकडच्या पुलांना जोडणारे रस्ते विकसित केले आहेत.
- उंच ध्वज आणि लायटिंग टॉवर्स: स्थानक सुशोभीकरण आणि दृश्यमानतेमध्ये प्रतीकात्मक आणि व्यावहारिक सुधारणा.
- प्रवेशद्वार विकास: स्वागतकारक प्रथमदर्शनी अनुभूतीसाठी प्रवेशद्वाराचे नूतनीकरण
- नवीन बोअरवेल: सातत्यपूर्ण पाणीपुरवठा सुनिश्चित करून प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना महत्त्वाचा दिलासा.


7. देवळाली -
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील देवळाली स्थानकावर आधुनिक प्रवासी सुविधा.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26.02.2024 रोजी देवळाली स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली.
एकूण प्रकल्प खर्च 10.44 कोटी रुपये आहे.
देवळाली स्थानकात आधुनिक पायाभूत सुविधा आणि प्रवाशांच्या सोयींमध्ये सुधारणा झाल्याने मोठे परिवर्तन झाले आहे:
- आजूबाजूचे क्षेत्र आणि पार्किंग: वाहतूक प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी आणि प्रवाशांना सुलभतेने ये-जा करता येण्यासाठी विस्तारित आणि चांगल्या प्रकारे विकसित.
- नवीन प्रवेशद्वार आणि पोर्च: स्थानकाचे प्रवेशद्वार अधिक आकर्षक दिसण्यासाठी सुधारित दर्शनी भाग.
- फलाटावरील सुधारणा:
- फलाटाच्या पृष्ठभागाचे नूतनीकरण
- चांगला निवारा आणि प्रवाशांच्या सोयीसाठी विस्तारित सीओपी
- दिव्यांगजन सुविधा:
- नूतनीकरण केलेले सुलभ शौचालय
- विशेष-दिव्यांग प्रवाशांसाठी दोन नवीन वॉटर स्टँड
- नवीन बुकिंग कार्यालय: सुधारित तिकीट सेवांसाठी बांधलेले.
- बाग सुशोभीकरण : स्थानक परिसरात विकसित केलेले सुंदर हिरवेगार क्षेत्र.
- अद्ययावत कार्यालय: चांगल्या परिचालन कार्यक्षमतेसाठी सुधारित कार्यक्षेत्रे.
- प्रवासी-स्नेही अतिरिक्त सुधारणा:
- फलाटावर सहज प्रवेशासाठी दोन लिफ्ट
- एक्झिक्युटिव्ह लाउंज, एसएस आणि आरक्षण कार्यालय आता वातानुकूलित
- वीज आणि प्रकाश सुधारणा:
- एएमएफ पॅनेलसह 62.5 केव्हीए डीजी सेट
- 2 हाय मास्ट आणि 2 स्टेडियम मास्ट दिवे
- पीएफ, एफओबी आणि कार्यालयांमध्ये स्वयंचलित मंद होणारे दिवे
- सुशोभीत प्रकाशयोजनेसाठी बागेतील दिवे आणि अष्टकोनी खांब
- सुधारित फलक आणि ओळख:
- नवीन चिन्हफलक
- अधिक सुस्पष्ट आणि समावेशकतेसाठी स्थानकाच्या नावाचे तीन भाषेतील फलक
- विश्वासार्ह वीज पुरवठा:
- नवीन उपकेंद्र
- वर्धित केबल आणि पॅनेल-आधारित पुरवठा प्रणाली



8. सावदा -
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील सावदा स्थानकावर वाढीव प्रवासी सुविधा.
26.02.2024 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावदा स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली.
एकूण प्रकल्प खर्च: 8.11 कोटी
प्रवाशांचा आराम, प्रवेश सुलभता आणि स्वच्छता यावर लक्ष केंद्रित करून सावदा स्थानक अद्ययावत करण्यात आले आहे:
- आधुनिक माहिती प्रणाली
- नवीन सार्वजनिक घोषणा प्रणाली (एनटीईएस-आधारित)
- रिअल-टाइम ट्रेन अपडेट्ससाठी कोच डिस्प्ले बोर्ड आणि प्लॅटफॉर्म इंडिकेटर बोर्ड
- शौचालय सुविधा
- महिला शौचालये - 2 (प्रत्येक फलाटावर एक)
- पुरुषांसाठी स्वच्छतागृहे - 2 (प्रत्येक फलाटावर एक)
- दिव्यांग शौचालये - 2 (दोन्ही फलाटांवर उपलब्ध)
- पिण्याचे पाणी
- फलाट 1 वर वॉटर कूलरची व्यवस्था
- बसण्याची आणि वाट पाहण्याची सुविधा
- 16 नवीन स्टील बेंच (प्रत्येकी 3 प्रवाशांसाठी)
- सामान्य द्वितीय श्रेणीतील प्रवाशांसाठी एक प्रतीक्षालय
- स्वच्छता आणि सुशोभीकरण
- 8 नवीन एसएस कचराकुंडी
- ग्रॅनाइट फिटिंग्जसह -आरामदायी केलेले फलाटांचे पृष्ठभाग
- सुलभतेने वापराच्या सुविधा
- सुरक्षित आणि अधिक सोयीस्कर पद्धतीने ये-जा करता यावी यासाठी छपराने आच्छादित पायऱ्यांसह फूट ओव्हर ब्रिज (एफओबी)


9. धुळे -
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या धुळे स्थानकावर प्रवासी सुविधांमध्ये वाढ
26.02.2024 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली.
एकूण प्रकल्प खर्च: 9.13 कोटी
प्रवाशांना सुखद अनुभव देण्यासाठी आणि एकूणच स्थानकाचे सौंदर्य वाढविण्यासाठी धुळे स्थानक लक्षणीयरीत्या अद्ययावत करण्यात आले आहे:
- फलाट आणि लगतच्या क्षेत्रात सुधारणा
- फलाटावर नवीन सीओपी काम
- फलाट आणि लगतच्या क्षेत्रात नवीन फरसबंदी
- प्रवाशांचा ओघ चांगला ठेवण्यासाठी आजूबाजूच्या परिसराचा विस्तार
- शौचालये आणि प्रतीक्षा सुविधा
- पुरुष आणि महिलांसाठी नवीन सामान्य शौचालये
- समर्पित दिव्यांगजन शौचालय
- नूतनीकरण केलेले सर्वसाधारण प्रतीक्षालय आणि सामान्य प्रतीक्षा दालन
- प्रवाशांची सोय आणि प्रवेश
- नवीन प्रवेश आणि निर्गमन दरवाजे
- गाडीबाबत घोषणा प्रणाली, रेल्वेगाडी माहिती प्रदर्शन बोर्ड आणि कोच इंडिकेटर
- चांगल्या दळणवळणासाठी नवीन चिन्हांकित फलक आणि स्थानक चिन्ह फलक
- बुकिंग आणि ऐतिहासिक वारसा संबंधित सामग्रीचा प्रचार
- एका हेरिटेज नॅरोगेज कोचमध्ये अनोख्या बुकिंग ऑफिसची स्थापना
- बाग आणि प्रकाशयोजना
- कारंज्यासह नवीन विकसित मोठी बाग
- आजूबाजूच्या क्षेत्रात आणि कंपाऊंड भिंतींवर सजावटीची प्रकाशयोजना
- व्हीआयपी आणि कर्मचारी सुविधा
- नवीन व्हीआयपी कक्ष
- सर्व रेल्वे कार्यालयांचे नूतनीकरण
- वीज आणि साधनसुविधा
- नवीन विद्युत उपकेंद्र (काम प्रगतीपथावर)
- अखंडित सेवांसाठी जनित्र बसवले आहे.
Q862.JPG)


10. मूर्तिजापूर -
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील मूर्तिजापूर स्थानकावर प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा.
26.02.2024 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मूर्तिजापूर स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली.
एकूण प्रकल्प खर्च: 7.68 कोटी
महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांच्या विकासामुळे मूर्तिजापूर स्थानकाची सुविधा, सुरक्षितता आणि सौंदर्य वाढले आहे:
- प्रवासी इंटरफेस आणि प्रवेशयोग्यता
- नवीन तिकिट कार्यालय इमारत
- प्रवाशांच्या सुरळीत वाहतुकीसाठी दोन प्रवेश/निर्गमन दरवाजे.
- फलाटावर वर सहज पोहोचण्यासाठी तीन उद्वाहने
- आजूबाजूचे आणि पार्किंग क्षेत्र: 1600 चौ.मी. पेक्षा जास्त विकसित.
- फलाट सुविधा
- पाण्याचे स्टँड: फलाट 1वर 5
- नवीन शौचालय कक्ष : फलाट 1 आणि 2 वर प्रत्येकी 1.
- पोलीस शेड:
- फलाट 1 - 1900 चौ.मी.
- फलाट 2- 2100 चौ.मी.
- फलाट पृष्ठभाग:
- फलाट 1 - 4000 चौ.मी.
- फलाट 2 - 5500 चौ.मी.
- इमारत आणि कार्यालय नूतनीकरण
- फलाट 1वरील नूतनीकरण केलेल्या खोल्या (10 खोल्या):
- व्हीआयपी कक्ष, एसएम कार्यालय, ओएस कार्यालय, पुरुष आणि महिला प्रतीक्षालये, एसएसई/टेलिकॉम, एसएसई/एस अँड टी (2 खोल्या)
- फलाट 2 वरील नूतनीकरण केलेल्या खोल्या (2 खोल्या):
- पुरुष आणि महिला प्रतीक्षालय
- प्रकाशयोजना आणि पायाभूत सुविधा
- हाय मास्ट लाईट आणि स्टेडियम मास्ट बसवले.
- ध्वजस्तंभ उपलब्ध केला आहे.
- सुधारित खात्रीलायक विजेसाठी नवीन विद्युत उपकेंद्र इमारत.
- संरक्षक क्षेत्र विकास
- सुरक्षेसाठी 250 मीटरपेक्षा जास्त लांबीची संरक्षक भिंत बांधली.



11. केडगाव –
केडगाव स्थानकावरील प्रवासी सुविधा उन्नतीकरण (पुणे विभाग)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26.02.2024 रोजी केडगाव स्थानक पुनर्विकास प्रकल्पाची पायाभरणी केली.
एकूण प्रकल्प खर्च रु 12.55 कोटी
केडगाव स्थानकावर प्रवाशांसाठी पायाभूत सुविधा आणि आधुनिक सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत:
- प्रवासी प्रवेश आणि संपर्क
- तिकिट सेवेच्या सुव्यवस्थित अनुभवासाठी नवीन तिकीट कार्यालय तयार केले
- प्रवाशांची ये-जा व वाहनतळासाठी सुधारित क्षेत्र रचना
- फलाट उन्नतीकरण
- प्रवाशांच्या सुलभतेसाठी फलाटाच्या पृष्ठभागाचे नूतनीकरण
- उन्हापासून व पावसापासून संरक्षणासाठी नवीन सीओपी (कव्हर्ड ओव्हरहेड प्लॅटफॉर्म) छत
- भरपूर प्रकाश व आरामदायी अनुभवासाठी एलईडी दिवे आणि पंखे लावले
- पिण्याचे पाणी आणि स्वच्छता
- प्रवाशांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याच्या नवीन सुविधा
- शुल्क देऊन वापरण्याच्या स्वच्छतागृहांचे बांधकाम, त्यामध्ये दिव्यांगांसाठी अनुकूल स्वच्छतागृहाची सोय
- सुरक्षा आणि संवाद
- गाड्यांच्या प्रत्यक्ष वेळेनुसार घोषणांसाठी (एनटीईएस आधारित) सार्वजनिक उद्घोषणा व्यवस्था
- रेल्वेगाडीचा डबा मार्गदर्शक व फलाटावर गाडीच्या आवागमानाची माहिती देणारे इंडिकेटर
- स्थानक परिसरात मार्गदर्शनपर नवीन नाम, दिशादर्शक फलक
- सौंदर्यीकरण
- रेल्वे स्थानक परिसरात वृक्षारोपण व हिरवे पट्टे विकसित
- स्थानकाचे सौंदर्यीकरण – सुधारित प्रवेशद्वार व रंगकाम
- फर्निचर व सुविधा
- फलाटावर व प्रतीक्षालयात नवीन एसएस बाके व कचरापेट्या
- सामान्य प्रवाशांसाठी प्रतीक्षालयाचे उन्नतीकरण

12. लोणंद
लोणंद स्थानकावरील प्रवासी सुविधा उन्नतीकरण (पुणे विभाग)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26.02.2024 रोजी लोणंद स्थानक पुनर्विकास प्रकल्पाची पायाभरणी केली.
एकूण प्रकल्प खर्च रु.10.48 कोटी
लोणंद स्थानकावर प्रवाशांची सोय, सुरक्षितता लक्षात घेऊन प्रवासाचा दर्जा सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण विकासकामे करण्यात आली आहेत.
- प्रवासी संपर्क आणि प्रवेश
- आधुनिक तिकीट खिडक्यांसह रांगेसाठी पुरेशी जागा असलेले नवीन तिकीट कार्यालय
- स्वतंत्र प्रवेश/निर्गमन मार्गासह सुधारित परिसर रचना
- फलाट सुविधा
- फलाटाचा सुधारित पृष्ठभाग
- ऊनपावसापासून संरक्षणासाठी सीओपी छताचा विस्तार
- नवीन स्टील व ग्रॅनाइट बाक.
- एलईडी दिवे व पंखे लावल्यामुळे ऊर्जेचा कार्यक्षम वापर
- पाणी व स्वच्छता
- फलाटावर पिण्याच्या पाण्याची सुविधा
- शुल्क भरून वापरण्याची स्वच्छतागृहे, सर्व फलाटांवर दिव्यांगांना सोयीस्कर सुविधा
- माहिती प्रणाली
- अचूक व वेळेवर घोषणांसाठी (एनईटीएस आधारित) सार्वजनिक उद्घोषणा व्यवस्था
- रेल्वेगाडीच्या डब्यांसाठी मार्गदर्शनपर व फलाटावर दिशादर्शक फलक
- स्थानक परिसरात दिशादर्शक फलक
- सौंदर्यीकरण व सुरक्षा
- कलात्मक सजावटीसह प्रवेशद्वाराचे सौंदर्यीकरण
- फलाटावर व स्थानक परिसरात हिरवाई आणि वृक्षारोपण
- त्रिभाषिक फलक
- सौंदर्य व सुरक्षेसाठी नवीन ध्वजस्तंभ व उंच खांबावरील दिवे
- अतिरिक्त सुविधा
- सामान्य प्रवाशांसाठी प्रतीक्षालयाचे उन्नतीकरण
- योग्य अंतरावर कचरापेट्या
- वीजपुरवठा अखंड राहावा म्हणून इलेक्ट्रिक उपकेंद्र
या दोन्ही स्थानकांचा पुनर्विकास ‘अमृत भारत स्थानक योजने’ अंतर्गत केला असून प्रवासानुभव, सहज प्रवेश व शहरी भागाशी एकात्मिकरण याने मोठे बदल घडून येत आहेत. पंतप्रधानांच्या आधुनिक, सर्वसमावेशक आणि प्रवासी-केंद्रित रेल्वे पायाभूत सुविधांच्या दृष्टीकोनाच्या पूर्ततेसाठी रेल्वे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.


0EKE.JPG)
नागपूर विभागातील उर्वरित तीन स्थानकांचा खर्च पुढीलप्रमाणे -
13. नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी स्थानक – रु. 12.39 कोटी
IM05.jpeg)

14. चांदा फोर्ट स्थानक – रु. 19.30 कोटी

15. आमगाव स्थानक – रु. 7.17 कोटी
JLJ5.JPG)
DJN0.jpg)
स्रोत - जनसंपर्क विभाग, मध्य रेल्वे
***
S.Tupe/S.Patil/T.Pawar/S.Chitnis/V.Joshi/N.Mathure/R.Bedekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2130327)