संरक्षण मंत्रालय
संरक्षण राज्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळ मलेशियातील 17व्या लंगकावी आंतरराष्ट्रीय सागरी आणि एअरोस्पेस प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात सहभाग
संजय सेठ यांच्या हस्ते स्वदेशी संरक्षण उद्योगाची क्षमता दर्शविणाऱ्या ‘इंडिया पॅव्हिलिअन’चे उद्घाटन
Posted On:
20 MAY 2025 10:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 मे 2025
संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळ 20 मे 2025 रोजी मलेशियातील लंगकावी इथे 17व्या लंगकावी आंतरराष्ट्रीय सागरी आणि एअरोस्पेस प्रदर्शन (लिमा 2025)च्या उद्घाटन समारंभात सहभागी झाले. या पाच दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन मलेशियाचे पंतप्रधान दातो’ सेरी अन्वर बिन इब्राहिम यांनी केले.
संरक्षण राज्यमंत्र्यांनी लिमा 2025 मध्ये भारताच्या दालनाचे, ‘इंडिया पॅव्हिलिअन’चे उद्घाटन केले. या पॅव्हिलिअनमध्ये भारताच्या स्वदेशी संरक्षण उद्योगाचे सामर्थ्य प्रदर्शित करण्यात आले असून यामध्ये संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (डीपीएसयूज्) आणि खासगी कंपन्या सहभागी झाल्या आहेत. या कार्यक्रमातून भारताने आत्मनिर्भर संरक्षण क्षमतेचा संदेश जागतिक स्तरावर दिला आहे. ाह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली व हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) निर्मित डॉर्नियर विमान यासारख्या स्वदेशी तंत्रज्ञानांचे प्रदर्शन 'इंडिया पॅव्हिलिअन' मध्ये मांडले आहे. प्रमुख आंतरराष्ट्रीय देशांच्या उपस्थितीत भारताच्या प्रभावशाली उपस्थितीने जागतिक संरक्षण उत्पादन क्षेत्रात भारताची वाढती भूमिका अधोरेखित होते.
संरक्षण राज्यमंत्र्यांनी प्रदर्शन स्थळी इतर स्टॉल्सना भेट दिली आणि विविध देशांतील मान्यवर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
भारत आणि मलेशिया यांच्यातील संबंध बळकट आणि बहुआयामी असून, 2024 मध्ये मलेशियाच्या पंतप्रधानांनी केलेल्या भारत दौऱ्यादरम्यान निर्माण केलेल्या संपूर्ण धोरणात्मक भागीदारी अंतर्गत हे संबंध सैन्य आणि सुरक्षेच्या क्षेत्रातही विस्तारले आहेत.
1991 पासून सुरू झालेले आणि दर दोन वर्षांनी भरविले जाणारे लिमा प्रदर्शन हे आशिया-प्रशांत प्रदेशातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या सागरी व एअरोस्पेस प्रदर्शनांपैकी एक मानले जाते.
S.Kakade/R.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2130109)