उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आपल्या हिताविरुद्ध काम करत असलेल्या आणि संकटाच्या काळात आपल्या विरोधात भूमिका घेणार्‍या देशांमधे प्रवास करून किंवा तिथून आयात करून त्यांना सक्षम करणे यापुढे आपल्याला परवडू शकत नाही : उपराष्ट्रपती जगदीप धनखड

Posted On: 17 MAY 2025 1:46PM by PIB Mumbai

 

आपल्या हिताविरुद्ध काम करत असलेल्या देशांना सक्षम करणे आपल्याला परवडू शकते का... असा सवाल उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केला आहे. आपण आर्थिक राष्ट्रवादाचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे असेही त्यांनी म्हटले आहे. नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे आज जयपूरिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या वार्षिक दीक्षांत समारंभाला उपराष्ट्रपतींनी संबोधित केले,त्यावेळी ते बोलत होते.आपला  देश संकटाच्या काळात असताना  त्याच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या  देशांमधे प्रवास करून किंवा तिथून आयात करून त्या देशांच्या अर्थव्यवस्था सुधारण्यात सहभाग देणे यापुढे आपल्याला परवडू शकत नाही असे ठाम मतही त्यांनी व्यक्त केले.

प्रत्येक व्यक्ती देशाच्या सुरक्षेत मदत करण्याच्यादृष्टीने सक्षम आहे. विशेषतः व्यापार, व्यवसाय, वाणिज्य आणि उद्योग क्षेत्र सुरक्षाविषयक मुद्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यामुळे आपण कायमच राष्ट्र प्रथम ही भावना मनात जपली पाहीजे यावर आपला ठाम विश्वास असल्याचे ते म्हणाले. प्रत्येक कृती ही राष्ट्रवादाप्रती दृढ वचनपद्धता, अढळ निष्ठा आणि समर्पणाच्या आधारावरच केली गेली पाहिजे. आणि हीच भावना आपण आपल्या लहान मुलांमधे अगदी सुरुवातीपासूनच रुजवली पाहिजे असे ते म्हणाले.

यावेळी उपराष्ट्रपतींनी सध्या सुरू असलेल्या ऑपरेशन सिंदूरची प्रशंसा केली आणि भारताच्या सशस्त्र दलांना अभिवादनही केले.

भारताने दहशतवादविरोधी प्रयत्नांच्या बाबतीत एक नवीन मापदंड स्थापित केला असल्याची बाबही उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी यावेळी नमूद केली.

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेली कारवाई ही भारताने आजवर सीमेपलीकडे सर्वाधिक दूर अंतरापर्यंत केलेली कारवाई ठरली असल्याचे ते म्हणाले. दहशतवाद्यांव्यतिरिक्त इतर कोणतीही हानी होणार नाही अशारितीने अत्यंत सतर्कतेने आणि अचूकपणे केलेली ही कारवाई होती अशा शब्दांत त्यांनी या मोहिमेचा गौरव केला.

देशाविरोधातील मते आणि विचारप्रवाहांकडे आपण कसे का

दुर्लक्ष करू शकतो, ते कसे सहन करू शकतो? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. परदेशी विद्यापीठे या देशात येत आहेत, त्यांची योग्य छाननी करणे आवश्यक आहे. यासाठी सखोल विचार करण्याची आवश्यकता असून, याबद्दल आपण अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे असे ते म्हणाले.

कॉर्पोरेट क्षेत्राने शैक्षणिक संस्थांचा संपूर्ण आर्थिक भार उचलायला हवा संशोधनातील गुंतवणुक अत्यंत मूलभूत असते आणि त्यामुळेच सामाजिक  दायित्व निधीत याला प्राधान्य दिले पाहीजे असे आवाहन त्यांनी उद्योग क्षेत्रातील दिग्गजांना केले.

***

N.Chitale/T.Pawar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2129320)