दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ट्रायने मार्च-2025 मध्ये महाराष्ट्र पसेभू, पूर्व उत्तर प्रदेश पसेभू, मुंबई आणि महाराष्ट्र पसेभू,हरियाणा पसेभू, तामिळनाडू पसेभू, जम्मू आणि काश्मीर पसेभू आणि मध्य प्रदेश पसेभू या आठ परवानाधारक सेवा भूभागांमधील शहर/महामार्ग/रेल्वे मार्ग/ किनारी क्षेत्रे इथे घेतलेल्या स्वतंत्र वहन  चाचण्या (आयडीटी) बद्दल अहवाल  केला प्रसिद्ध

Posted On: 16 MAY 2025 5:44PM by PIB Mumbai

 

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण -ट्रायने त्यांच्या नियुक्त एजन्सीद्वारे, नागपूर शहर (महाराष्ट्र पसेभू), प्रयागराज शहर आणि प्रयागराज ते कानपूर पर्यंतचा रेल्वे मार्ग( पूर्व उत्तर प्रदेश पसेभू) मुंबई शहर आणि मुंबई ते पुणे एक्सप्रेसवे पर्यंतचा महामार्ग मार्ग, मुंबई सेंट्रल ते वसई रोड पर्यंतचा रेल्वे मार्ग आणि गेटवे ऑफ इंडिया ते घारापुरी लेणी (मुंबई आणि महाराष्ट्र पसेभू) किनारी मार्ग , अंबाला शहर (हरियाणा पसेभू), चेन्नई शहर आणि चेन्नई ते कोइम्बतूरपर्यंतचा महामार्ग  आणि विजयवाडा ते चेन्नई आणि कोइम्बतूर ते चेन्नई (तामिळनाडू पसेभू), श्रीनगर शहर (जम्मू आणि काश्मीर पसेभू) आणि इंदूर शहर (मध्य प्रदेश पसेभू) येथील शहरे/महामार्ग/रेल्वे मार्ग/ किनारी क्षेत्र येथे स्वतंत्र वहन  चाचण्या (आयडीटी) घेतल्या. मार्च - 2025 मध्ये सेल्युलर मोबाइल टेलिफोन सेवा प्रदात्यांनी व्हॉइस आणि डेटा सेवांसाठी प्रदान केलेल्या सेवेच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी या वहन चाचण्या घेण्यात आल्या.

आयडीटीमध्ये मेसर्स भारती एअरटेल लिमिटेड, मेसर्स बीएसएनएल/एमटीएनएल, मेसर्स रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड आणि मेसर्स व्होडाफोन आयडिया लिमिटेड यांच्या कामगिरीचे मोजमाप, जे व्हॉइस आणि डेटासाठी विविध तंत्रज्ञानाद्वारे (2जी/3जी/4जी/5जी सारख्या) परवानाधारक सेवा भूभागात (पसेभू) सेवा प्रदान करतात, वहन चाचणीद्वारे केले गेले आहे. वहन चाचणी अहवालांमध्ये सादर केलेले निरीक्षण वहन चाचणी आयोजित करण्याच्या दिवशी/वेळेस चाचणी अंतर्गत भूभाग/मार्गावरील सेवा प्रदात्यांच्या कामगिरीचे प्रतिनिधित्व करतात.

सविस्तर अहवाल ट्रायचे संकेतस्थळ www.trai.gov.in वर उपलब्ध आहेत. कोणत्याही स्पष्टीकरणासाठी/माहितीसाठी, ट्रायचे सल्लागार (क्यूओएस-आय) तेजपाल सिंग यांच्याशी adv-qos1@trai.gov.in  या ईमेलवर किंवा दूरध्वनी क्रमांक +91-11-20907759 वर संपर्क साधता येईल.

परिशिष्ट- अ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

***

S.Kane/N.Mathure/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2129167)
Read this release in: English , Urdu , Hindi