वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एप्रिल 2025 दरम्यान एकूण निर्यात (वस्तूमाल आणि सेवा) अंदाजे 73.80 अब्ज अमेरिकी डॉलर इतका राहण्याचा अंदाज,एप्रिल 2024 दरम्यान 65.48 अब्ज अमेरिकी डॉलर इतक्या निर्यातीच्या तुलनेत अंदाजे 12.70% वाढ

Posted On: 15 MAY 2025 10:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 मे 2025


एप्रिल 2025* या महिन्यामधील भारताची एकूण निर्यात (वस्तूमाल आणि सेवा एकत्रित) अंदाजे 73.80 अब्ज अमेरिकी डॉलर राहील असा  अंदाज असून  एप्रिल 2024 मधल्या एकूण निर्यातीच्या तुलनेत यात 12.70 टक्क्यांची सकारात्मक वाढ  राहील. एप्रिल 2025* मधील एकूण आयात (वस्तूमाल आणि सेवा एकत्रित) अंदाजे 82.45 अब्ज अमेरिकी डॉलर राहण्याचा अंदाज आहे.

तक्ता 1

Table 1: Trade during April 2025*

 

 

April 2025

(US$ Billion)

April 2024

(US$ Billion)

Merchandise

Exports

38.49

35.30

Imports

64.91

54.49

Services*

Exports

35.31

30.18

Imports

17.54

16.76

Total Trade

(Merchandise +Services) *

Exports

73.80

65.48

Imports

82.45

71.25

Trade Balance

-8.65

-5.77

टीप : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सेवा क्षेत्रासंबंधी जारी केलेली ताजी माहिती मार्च 2025 शी संबंधित आहे. एप्रिल 2025 ची माहिती हा एक अंदाज आहे, या अंदाजात भारतीय रिझर्व्ह बँकेच्या या पुढच्या प्रसिद्धीपत्रकात सुधारणा केली  जाईल.

आकृती 1 : एप्रिल 2025* दरम्यानचा एकूण व्यापार

वस्तूमाल व्यापार

एप्रिल 2024 वस्तूमालाची एकूण निर्यात 35.30 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी होती, त्या तुलनेत एप्रिल 2025 मध्ये वाढ होऊन ती 38.49 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी झाली.

एप्रिल 2024 वस्तूमालाची एकूण आयात 54.49 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी होती, त्या तुलनेत एप्रिल 2025 मध्ये वाढ होऊन ती 64.91 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी झाली.

आकृती 2: एप्रिल 2025 दरम्यानचा वस्तूमाल व्यापार

 

 

April 2025

(US$ Billion)

April 2024

(US$ Billion)

Non- petroleum exports

31.11

28.26

Non- petroleum imports

44.20

37.99

Non-petroleum & Non-Gems & Jewellery exports

28.61

26.00

Non-petroleum & Non-Gems & Jewellery imports

39.27

33.26

एप्रिल 2024 मध्ये बिगर पेट्रोलियम तसेच रत्ने आणि आभूषणे वगळून असलेली निर्यात 26 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी होती त्यात एप्रिल 2025 मध्ये वाढ होऊन ती 28.61 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी झाली. .

एप्रिल 2024 मध्ये बिगर पेट्रोलियम तसेच रत्ने आणि आभूषणे वगळून असलेली (सोने, चांदी आणि मौल्यवान धातू) आयात 33.26 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी होती, त्यात एप्रिल 2025 मध्ये वाढ होऊन ती 39.27 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी झाली.

टीप: रत्ने आणि आभूषणे आयातीत सोने, चांदी आणि मोती, मौल्यवान आणि अर्ध-मौल्यवान रत्नांचा समावेश आहे.

आकृती 3 : एप्रिल 2025 दरम्यान पेट्रोलियम आणि तसेच रत्ने आणि आभूषणे वगळून असलेला व्यापार

सेवा क्षेत्रविषयक व्यापार

एप्रिल 2025 सेवा क्षेत्रांतर्गत निर्यातीचे अंदाजित मूल्य 35.31 अब्ज अमेरिकी डॉलर इतके आहे, तर एप्रिल 2024 मध्ये ते 30.18 अब्ज अमेरिकी डॉलर इतके होते.

एप्रिल 2025 मध्ये सेवा क्षेत्रांतर्गत आयातीचे अंदाजित मूल्य 17.54 अब्ज अमेरिकी डॉलर इतके असून, एप्रिल 2024 मध्ये ते 16.76 अब्ज अमेरिकी डॉलर इतके होते.

आकृती 4 : एप्रिल 2025* दरम्यानचा सेवा क्षेत्राअंतर्गतचा व्यापार

एप्रिल 2024 च्या तुलनेत एप्रिल 2025 मध्ये आयातीच्या स्त्रोतांच्या बाबतीत मूल्य बदलाच्या अनुषंगाने संयुक्त अरब अमिराती (88.97%), चीन (27.08%), अमेरिका (63.76%), रशिया (17.82%) आणि आयर्लंड (425.65%) या पाच प्रमुख देशांमध्ये वाढ नोंदवली गेली आहे.

त्वरीत अंदाज पाहण्यासाठीचा दुवा

N.Chitale/T.Pawar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 


(Release ID: 2128981)
Read this release in: English , Urdu , Hindi