अंतराळ विभाग
azadi ka amrit mahotsav

जागतिक स्तरावर अंतराळ शक्ती म्हणून भारताचे वाढते प्राबल्य सिद्ध होत असल्याचे डॉ. जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन


Posted On: 09 MAY 2025 5:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 मे 2025

 

जागतिक स्तरावर अंतराळ शक्ती म्हणून भारताचे  वाढते प्राबल्य सिद्ध  होत असल्याचे  केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी अधोरेखित केले आहे.ते आज  नवी दिल्लीतील  भारत मंडपम येथे झालेल्या जागतिक अंतराळ संशोधन परिषदेला (जीएलईएक्स 2025) संबोधित करत होते.

जगभरातील अंतराळ विज्ञान क्षेत्रातील नेते, अंतराळवीर आणि शास्त्रज्ञ एकत्र आलेल्या, तसेच 35 हून अधिक देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचा सहभाग असलेल्या ‘अंतराळ संशोधन  ‘पुनर्जागरण-नव्या जगास सामोरे जाणे:’या संकल्पनेवरील  या अतिमहत्त्वाच्या शिखर परिषदेत,ते बोलत होते. यामुळे अंतराळ रणनीति आणि नवोपक्रमात भारताची आघाडीची भूमिका अधिक दृढ झाली आहे.

आंतरराष्ट्रीय अंतराळवीर महासंघ, भारतीय अंतराळ संशोधन संघटना आणि भारतीय अंतराळवीर सोसायटी यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या तीन दिवसीय शिखर परिषदेत, 15 महत्त्वाच्या विषयांना अनुसरून विविध क्षेत्रांच्या 10 समांतर तांत्रिक सत्रांतून 240 हून अधिक परस्परसंवादी सादरीकरणे आयोजित केली  आहेत. या कार्यक्रमात डॉ. जितेंद्र सिंह यांच्याद्वारे एका बहुविध अवकाश प्रदर्शनाचे उद्घाटन देखील झाले. या प्रदर्शनातील 22 स्टॉल्सवर भारतीय अंतराळ स्टार्टअप्स, आंतरराष्ट्रीय अंतराळ संस्था आणि इस्रोच्या अत्याधुनिक  कामगिरीचे प्रदर्शन करण्यात आले आहे.

अंतराळ संशोधनात भारताचा इतरांचे अनुकरण करण्यापासून ते जागतिक स्तरावर सक्षम बनण्यापर्यंतचा प्रवास; या दरम्यान झालेल्या विशेष सत्रात बोलताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी अधोरेखित केला. “भारत आता काही आघाडीच्या अवकाश-प्रवास करणाऱ्या राष्ट्रांसोबत सहभागीदार म्हणून सहयोग करत आहे. हे आमच्या वैज्ञानिक क्षमतेचे, दूरदर्शी नेतृत्वाचे आणि शांततापूर्ण अवकाश सहकार्याच्या वचनबद्धतेचे  उदाहरण आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, भारताचा अंतराळ प्रवास आता  इतर विकसनशील देशांसाठी आता प्रेरणास्रोत बनला आहे.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी ग्लेक्स ला "भारत " आणि "विश्व”  या दोन आघाड्यांवर भारताच्या दृष्टिकोनाला पुढे नेणारे व्यासपीठ म्हणून त्याचे वर्णन केले. अंतराळ क्षेत्राचे लोकशाहीकरण करण्यासाठी, खाजगी उद्योग आणि सार्वजनिक-खाजगी भागीदारीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने घेतलेल्या पुढाकारांवरही यावेळी त्यांनी प्रकाश टाकला.

 

* * *

N.Chitale/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2127946)
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil