सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री बी. एल. वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली बदायूं येथे सफाई कामगारांच्या सन्मानार्थ 'नमस्ते योजने'वरील विशेष कार्यक्रमाचे आयोजन

Posted On: 05 MAY 2025 8:37PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 मे 2025

 

केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालया द्वारे 5 मे 2025 रोजी उत्तर प्रदेशातील बदायूं इथे 'नॅशनल अॅक्शन प्लान फॉर मेकॅनाइज्ड सॅनिटेशन इकोसिस्टम (नमस्ते) या विषयावर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री बी. एल. वर्मा या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले आणि त्यांनी सफाई कामगारांचा (स्वच्छता सेवकांचा) सत्कार केला.

स्वच्छता सेवेतील कामगारांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, तसेच त्यांना सुरक्षित, सन्मानजनक आणि शाश्वत उपजीविका मिळवण्यासाठी सहाय्य करणे हे नमस्ते (NAMASTE) या कार्यक्रमाचे उद्दीष्ट आहे.

कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, ही केवळ एक सरकारी योजना नसून  समाजातील सर्वाधिक कष्ट करणाऱ्या लोकांच्या जीवनात खऱ्या अर्थाने बदल घडवून आणण्याचा संकल्प आहे. या लोकाभिमुख कार्यक्रमात सहभागी होऊन या सामाजिक परिवर्तनाचा भाग बनल्याबद्दल त्यांनी सामाजिक संस्था व नागरिकांची प्रशंसा केली.

  

कार्यक्रमाचे ठळक मुद्दे:

  • मलनिस्सारण आणि सेप्टिक टँक कामगारांना (एसएसडब्ल्यू) पीपीई किट आणि आयुष्मान कार्डचे वाटप.
  • लाभार्थ्यांना शिलाई मशिनचे वाटप.
  • डीआयईटी (DIET) चे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ आकर्षक रांगोळी काढली.

देशभरात आतापर्यंत 73,768 मलनिस्सारण आणि सेप्टिक टँक कामगारांची  प्रोफाइलिंग (संक्षिप्त माहिती ) करण्यात आले आहे. त्यापैकी 45 हजार 871 लाभार्थ्यांना पीपीई किट, 354 जणांना सुरक्षा उपकरणे आणि 27 हजार 103 लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड चे वाटप करण्यात आले आहे. या कार्यक्रमात बदायूं आणि शाहजहांपूर जिल्ह्यातील एकूण 324 मलनिस्सारण आणि सेप्टिक टँक कामगारांचे प्रोफाइलिंग पूर्ण झाले असून त्यांना पीपीई किट आणि आयुष्मान कार्ड देण्यात आली आहेत. शाहजहांपूर येथील काही लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी शिलाई मशिनचे देखील वाटप करण्यात आले आहे.

 

* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2127162)
Read this release in: English , Urdu , Hindi